व्हिडिओ क्लिप दाखवून अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, गुन्हा दाखल
By प्रदीप भाकरे | Updated: July 5, 2023 12:55 IST2023-07-05T12:54:18+5:302023-07-05T12:55:45+5:30
आरोपी हा अल्पवयीन मुलीला खाद्यपदार्थ देण्याचे आमिष दाखवत होता.

व्हिडिओ क्लिप दाखवून अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, गुन्हा दाखल
अमरावती : व्हिडिओ क्लिप दाखवून एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करण्यात आला. तिचा विनयभंग देखील करण्यात आला. २५ जूनपुर्वी ही घटना घडली. याप्रकरणी, राजापेठ पोलिसांनी ४ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास आरोपी मंगेश निरमा (रा. अमरावती) याच्याविरूद्ध बलात्कार, विनयभंग व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, आरोपी मंगेश हा त्या अल्पवयीन मुलीला खाद्यपदार्थ देण्याचे आमिष दाखवत होता. तो तिला बाहेर घेऊन गेला. तथा व्हिडीओ क्लिप दाखवून त्याने तिचा लैंगिक छळ केला. याबाबत तिचे समुपदेशाकडून समुपदेशन देखील करण्यात आले. ती बाब तिने तिच्या नातेवाईकाच्या उपस्थितीत समुपदेशकाला सांगितली.
हा प्रकार बालकल्याण समितीला अवगत करून देण्यात आला. त्यानंतर पिडितासह तिच्या जवळच्या नातेवाईकाचे समुपदेशन करण्यात आले. त्या समुपदेशानंतर पिडिताने नातेवाईकासह राजापेठ पोलीस ठाणे गाठले. महिला पोलीस अधिकाऱ्याने पिडिताची आपबिती ऐकून आरोपी मंगेश निरमाविरूद्ध गुन्हा दाखल केला.