शिरजगाव मोझरी शिवारात भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 22:14 IST2018-05-31T22:14:18+5:302018-05-31T22:14:18+5:30
तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील मौजा अनकवाडी, मालधूर शिवारातील जंगलात अचानक गुरुवारी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. ही आग गावात पोहोचण्याची शक्यता असल्याने गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.

शिरजगाव मोझरी शिवारात भीषण आग
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील मौजा अनकवाडी, मालधूर शिवारातील जंगलात अचानक गुरुवारी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. ही आग गावात पोहोचण्याची शक्यता असल्याने गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.
सूर्य आग ओकत असल्याने अचानक जंगलात आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की, मोठे झाडे यात जळून खाक झाली. रौद्र रूप धारण करीत आग गावातील वस्तीपर्यंत पोहोचली. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता पाहता गावकरी आग विचवण्यासाठी धावून आले. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. मात्र अडीच किलोमीटरचा परिसर जळून खाक झाला होता.
पावसाने दिलासा
मोठ्या प्रमाणात आग लागल्याने ती विझविण्यासाठी सर्वत्र धडपड सुरू होती. वरून सूर्य आग ओकत होता. तप्त उन्हात अचानकपणे पाऊस आला. त्यामुळे काही प्रमाणात आग आटोक्यात आली. त्यामुळे प्रमाणात वनस्पतींचे नुकसान झाले
शिवरा येथे भीषण आग
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील शिवरा येथील मरिमाय नाल्यातील काडीकचरा अचानक पेटून भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याची माहिती गावकºयांनी चांदूर रेल्वे अग्निशमन दलाला दिली. तातडीने अग्निशमन वाहन पोहचल्याने आग आटोक्यात आली गेली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.