शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

ओगलेंच्या सक्तीच्या सेवानिवृत्तीवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: March 7, 2017 00:17 IST

राज्यशासनाने महापालिकेचा १९ मार्च २०१६ च्या अमसभेतील ठराव अंतिमत: विखंडित केल्याने ...

आयुक्तांचे आदेश : महापालिका प्रशासनाचा २४ फेब्रुवारी २०१६ चा निर्णय ‘जैसे थे’अमरावती : राज्यशासनाने महापालिकेचा १९ मार्च २०१६ च्या अमसभेतील ठराव अंतिमत: विखंडित केल्याने तत्कलिन सहायक आयुक्त आर.बी.ओगले यांच्या सक्तीच्या सेवानिवृत्!ीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले आहे. नगरविकास विभागाने याबाबत शासननिर्णय पारित केल्याच्या पार्श्वभूमिवर आयुक्त हेमंत पवार यांनी शनिवारी एक आदेश काढून ओगले यांना २४ फेब्रुवारी २०१६ पासून सक्तीने सेवानिवृत्त करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. ओगले यांचा १५ डिसेंबर २००९ ते ६ मार्च २०१० पर्यंतचा निलंबन काळ सर्वप्रयोजनार्थ निलंबन काळ करण्यात येत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. या आदेशाची नोंद ओगले यांच्या सेवापुस्तिकेत घेण्यात यावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. ओगले यांना सक्तीने सेवानिवृत्त न करता महापालिकेच्या सेवेत पुन्हा रुजू करुन घ्यावे, हा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने पारित केलेला ठराव क्र. ३० (१९ मार्च २०१६) महापालिकेच्या आर्थिक व प्रशासकीय शिस्तीच्या विरोधात असल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ४५१ (३) नुसार अंतिमत: विखंडित झाल्याचे मानण्यात येत आहे.असा आदेश १ मार्र्च रोजी नगरविकास विभागाने पारीत केला होता.त्याआधारे आयुक्त हेमंत पवार यांनी त्याबाबत प्रशासकीय आदेश काढले आहेत.शिवाजीला नियमबाह्य सवलतअमरावती : ओगले हे झोन क्र. ३ मध्ये कार्यरत असताना त्यांनी विनापरवानगी स्वत:च्या अधिकारात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मालमत्तांना शिक्षण व रोजगार हमीकरात नियमबाह्य सवलत दिली होती. विभागीय चौकशीनंतर सहायक आयुक्त आर.बी.ओगले यांना महापालिकेच्या सेवेतून सक्तीने सेवानिवृत्त करण्यात यावे, या शिक्षेस सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव विषय क्र. ३० अन्वये तत्कालिन प्रशासनाने आमसभेसमोर ठेवला होता. १९ मार्च २०१६ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाचा प्रस्ताव नामंजूर करून प्रशासनाने त्यांचेवर ही कारवाई न करता परत कामावर रूजू करुन घ्यावे, असा ठराव सर्वानुमते मंजूर व कायम करण्यात आला होता. सर्वसाधारण सभेने पारित केलेला हा ठराव विखंडित करण्यात यावा, असे पत्र तत्कालीन आयुक्तांनी नगरविकास विभागाला पाठविले. त्यानंतर १३ जुलै २०१६ ला हा ठराव तात्पुरता निलंबित करण्यात आला व शासनाने याठरावाप्रकरणी आयुक्त आणि महापालिकेला अभिवेदन मागितले होते. विद्यमान आयुक्त हेमंत पवार यांनी यासंदर्भात तत्कालिन आयुक्तांनी दिलेली शिक्षा योग्य ठरवत राज्यशासनाकडे बाजू मांडली.त्याआधारे नगरविकास विभागाने ओगले यांना पुन्हा महापालिकेच्या सेवेत घेण्याचा महापालिकेचा प्रस्ताव विखंडीत केला.तो आदेश महापालिकेत पोहोचल्यानंतर आयुक्त हेमंत पवार यांनी ओगले यांच्या संदर्भात २४ फेब्रुवारी २०१६ चा प्रशासकीय मान्यतेचा ठराव लागू होत असल्याने त्यांच्या सक्तीच्या सेवानिवृत्तीवर प्रशासकीय शिक्कामोर्तब केले.महापालिकेचे आर्थिक नुकसान ओगले हे झोन क्र. ३ मध्ये सहायक आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी विनापरवानगी स्वत:च्या अधिकारात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मालमत्तांना शिक्षण व रोजगार हमीकरात १२ ते १३ लाखाची नियमबाह्य सवलत दिली होती. विभागीय चौकशीदरम्यान त्यांचेवरील आरोप सिद्ध झाले होते. त्यामुळे त्यांचेविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई व सक्तीने सेवानिवृत्ती ही शिक्षा प्रशासनाने ठरविली होती.तत्कालिन प्रशासनाने ओगले यांच्याबाबत घेतलेला सक्तीच्या स्वेच्छानिवृत्तीच्या शिक्षेचा निर्णय नगरविकास खात्याने कायम ठेवला आहे.