शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' वसतिगृहाची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: September 11, 2016 00:12 IST

पांढरी खानमपूर येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या शासकीय निवासी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण व अत्याचाराचा प्रयत्न प्रथमच घडला.

अंजनगाव सुर्जी : पांढरी खानमपूर येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या शासकीय निवासी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण व अत्याचाराचा प्रयत्न प्रथमच घडला. तरी येथील सुरक्षिततेच्या बाबतीतील ढिसाळपणा या विद्यार्थिनीच्या जीवावर बेतला. ज्या पद्धतीने या विद्यार्थिनीला केवळ एका अर्जाच्या आधारे, आई-वडील वगळून व त्यांच्याशी मोबाईल संपर्क न होता एका अनोळखी व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात आले, ही पद्धत अतिशय चुकीची व हलगर्जीपणाची आहे. पांढरी गावापासून दीड कि.मी अंतरावर लोकवस्ती नसलेल्या या निर्जन जागेवरच्या वसतिगृहात १३५ मुली राहतात. सुरक्षेचा आढावा घेऊन समाजकल्याण विभागाने येथील नियमांची आचारसंहिता लेखी पद्धतीने राबविणे आवश्यक आहे. पांढरीच्या या निवासी वसतिगृहात महिला अधीक्षकाचे पद आहे. पण या अधीक्षकाकडे दर्यापूरचा अतिरिक्त प्रभार आहे आणि या महिला अधीक्षक दर्यापूर येथेच राहतात. पांढरी येथील प्रशासन व सुरक्षा व्यवस्था सुरक्षा रक्षकाच्या भरवशावर सोडून देण्यात आली आहे. तब्बल १३५ मुली असलेल्या या वसतिगृहात शासनातर्फे जबाबदार महिला अधिकारी राहत नाही, ही शोकांतिका आहे. टोलेजंग इमारत असलेल्या या वसतिगृहाच्या पश्चिम दिशेच्या कंपाऊंडला पडलेले मोठे छिद्र तात्पुरती डागडुजी करून बंद करण्यात आले आहे. याठिकाणी विद्युत प्रवाह खंडीत झाल्यास जनरेटरची कोणतीही व्यवस्था नाही. सर्वात महत्वाचे हे की मुलींचे वसतीगृह असून सुद्धा याठिकाणी सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविलेले नाहीत. (तालुका प्रतिनिधी)