शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील शाळांना मिळणार स्थानिक शिक्षक; जिल्हा परिषदेच्या पाठपुराव्याला यश

By जितेंद्र दखने | Updated: October 5, 2023 17:45 IST

नागरिकांच्या मागणीला यश : २४७ उमेदवारांच्या नावाची यादी प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त

अमरावती : अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील (मेळघाट) - शिक्षक पदभरतीबाबत वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या ८० टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक शिक्षक पदासाठीची अर्हता धारण केलेले व पात्र असलेले युवकांना शाळांमधील रिक्त असलेल्या पदावर नियुक्त केली जाणार आहेत. २०२२-२३ च्या आधारावर संचमान्यता प्राप्त असून त्या नुसार ही पदभरतीची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे.

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याने अनेक ठिकाणच्या पालकांनी आंदोलन करून नवीन शिक्षकांची सातत्याने मागणी केली जात आहे. अशातच मेळघाट या अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील - शिक्षक पदभरतीबाबत वित्त विभागाच्या मान्यतेने रिक्त पदांच्या ८० टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी मिळाली आहे.

मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यात शिक्षकांची पेसा क्षेत्रातील बिंदूनामावली नुसार सुमारे ३१३ शिक्षकांची पदे आजरोजी रिक्त आहेत. या रिक्त पदासाठी शिक्षक पात्रता परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त स्थानिक उमेदवारांची मेळघाटातील पेसा क्षेत्रातील पदभरतीला शासनाने परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त यांनी जिल्हा परिषदेस दिले आहेत. याकरीता २४७ उमेदवारांच्या नावाची यादी प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे.

या उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्राची पडताळणी शिक्षण विभागा मार्फत केली जात आहे. यामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे पात्र ठरणाऱ्या शिक्षकांना आदिवासी भागातील शाळेवर रिक्त असलेल्या जागेवर नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही नियुक्ती देताना स्थानिक उमेदवारांनाच शिक्षक पदाची संधी मिळणार आहे. त्यामुळे आता मेळघाटातील ३१३ रिक्त जागेपैकी किती शिक्षकांची नियुक्त होते. याबाबतचे चित्र भरती प्रक्रियेच्या नंतरच स्पष्ट होणार आहे.

मेळघाटातील शाळांना प्रथम प्राधान्य

शासनाच्या सूचनेप्रमाणे शिक्षकांच्या रिक्त पदांपैकी ८० टक्के जागाच भरण्याचे निर्देश आहेत. ही पदे भरताना सर्व प्रथम दुर्गम भागातील शून्य शिक्षकी शाळा, त्यानंतर एक शिक्षकी व कमी शिक्षक असलेल्या शाळा असे प्राधान्यानुसार शिक्षक भरती केली जाणार आहे. तसेच सर्व शिक्षक हे स्थानिक असल्याने पुढे जिल्हा बदलीमुळे जागा रिक्त होणार नाहीत, हे विशेष.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळाzpजिल्हा परिषद