शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस, ‘बॅड टच’ही केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 10:33 IST

६ वर्षीय मुलगा त्या शाळेत पहिलीत शिकतो. सोमवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. काही वेळाने मुख्याध्यापकाने त्याला कार्यालयात बोलावले. त्याचे केस व्यवस्थित असतानाही ते कात्रीने कापले. विचित्र अंगविक्षेप केले. बालकाला ‘बॅड टच’देखील केला.

ठळक मुद्देनामांकित शाळेतील प्रकार, पॉक्सोन्वये अटक

अमरावती : मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेत पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थ्याचे केस कातरून त्याला ‘बॅड टच’ केल्याची धक्कादायक घटना येथील एका नामांकित शाळेत मंगळवारी उघड झाली. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी संबंधित ४८ वर्षीय मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

राजापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सातुर्णास्थित नामांकित शाळेत २१ मार्च रोजी बालकाचे केस कापल्याची घटना घडली. हा सहा वर्षीय मुुलगा त्या शाळेत पहिलीत शिकतो. सोमवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. काही वेळाने मुख्याध्यापकाने त्याला कार्यालयात बोलावले. त्याचे केस व्यवस्थित असतानाही ते कात्रीने कापले. विचित्र अंगविक्षेप केले. बालकाला ‘बॅड टच’देखील केला. अकस्मात घडलेल्या त्या घटनेमुळे तो चिमुकला भेदरला. समवयस्क व वर्गशिक्षकाला सांगण्याचे धाडस त्या लहानग्याला झाले नाही.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी पोर गुमसुम असल्याचे लक्षात येताच त्याच्या वडिलांनी त्याला कवेत घेतले. बाळ, काय झाले रे, असे आपुलकीने विचारताच तो एकदम रडायला लागला. त्याने वडिलांच्या कुशीत झेपावत शाळेत घडलेला प्रसंग सांगितला. तो भेदरला असल्याने वडिलांनी त्याला धीर दिला. मी तुझ्या मुख्याध्यापकांशी जाऊन बोलतो, असे म्हणत वडिलांनी त्याला प्रेमाने गोंजारले.

तुला माहीत आहे का, शाळा कुणाची आहे?

मुलासोबत घडलेल्या घटनेचा जाब विचारण्यासाठी वडील मंगळवारी शाळेत पोहोचले. मुख्याध्यापकाने त्यांनादेखील अश्लील शिवीगाळ केली. ‘तुला माहीत नाही, ही शाळा कुणाची आहे. तो तुझा बाप आहे. मुकाट्याने येथून निघून जा,’ अशी धमकी वडिलांना देण्यात आली. त्यामुळे वडिलांनी मंगळवारी दुपारी थेट राजापेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी मुख्याध्यापकाला तत्काळ बेड्या ठोकल्या. त्याच्याविरुद्ध पोक्सो व भांदविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित पालकाच्या तक्रारीवरुन 'त्या' मुख्याध्यापकाविरुद्ध पोक्सो व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला. त्याला मंगळवारी तातडीने अटक करण्यात आली.

मनीष ठाकरे, ठाणेदार, राजापेठ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षक