शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गुलाब पाकळ्यांचा पदस्पर्शानंतर रंगातून उमटविले पाऊलखुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 19:11 IST

शाळेच्या पहिल्याच दिवशी नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गुलाब फुलांच्या पाकळ्या सजविल्या. फुलांच्या पाकळ्यांच्या पदस्पर्शानंतर ताटातील रंगात पाय भिजवून पाऊलखुणा कागदावर उमटविल्या.

अमरावती - शाळेच्या पहिल्याच दिवशी नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गुलाब फुलांच्या पाकळ्या सजविल्या. फुलांच्या पाकळ्यांच्या पदस्पर्शानंतर ताटातील रंगात पाय भिजवून पाऊलखुणा कागदावर उमटविल्या. हा आगळा उपक्रम महापालिकेच्या वडाळीस्थित एसआरपीएफ शाळेत मंगळवारी राबविण्यात आला. यावेळी पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये प्रफुल्लीत वातावरणाची निर्मिती झाली होती.      आपल्या पाल्याचा शाळेतील पहिला दिवस पालकांसाठी उत्सुकतेचा असतो. मुलांचे शाळेतील पहिले पाऊल पडताना पालकांच्या चेहºयावर आनंदाचे हावभाव दिसून आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांमध्ये आनंदासोबतच भीतीचेही वातावरण दिसून आले. अशाप्रसंगी शाळेतील वातावरण भीतीमुक्त व प्रफुल्लीत असेल, तर ते विद्यार्थीसुद्धा शाळेत जाण्याची उत्सुकता दाखवितात. मुलांच्या भावना ओळखून त्यांना एक आनंददायी व उत्साहीत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वडाळीतील एसआरपीएफ शाळेने केला. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी व पालकांना नेहमी स्मरणात राहावा, या उद्देशाने मनपा शाळेतील शिक्षकांनी नाविन्यपूर्वक उपक्रम राबविला. २६ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजताच इयत्ता पहिलीतील नवप्रवेशित मुलांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. मुला-मुलींनी शाळेत प्रवेश करताना पायरीवर पाय ठेवला असता, त्यांच्या पायाखाली मऊ असा गुलाब पुष्पांचा पदस्पर्श लाभला. शाळेच्या प्रवेशद्वारावरच गुलाब फुलांच्या पाकल्या अंथरून ठेवल्या होत्या. शाळेत प्रवेश करणाºया विद्यार्थ्यांच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्याचा वर्षाव होत असल्याचे बघून मुले प्रफुल्लित झाली होती. एवढेच नव्हे वधु-वर नवघरी प्रवेश करताना, त्याच्या पाऊलखुणा घेण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे मुलाच्या पाऊल ताटातील रंगात भिजवून एका कागदावर ते उतरविण्यात आले. त्यानंतर मुलांच्या पाऊलखुणांचा तो कागद पालकांना भेट देण्यात आला. शाळा व्यवस्थापनाचा हा उपक्रम पाहून पालकवर्ग गहिवरले. या नवख्या उपक्रमासाठी नगरसेवक आशिष गावंडे, मुख्याध्यापिका प्रिति खोडे, योगेश पखाले, राहुल तायडे, योगेश चाटे, उज्वला भिसे यांनी परिश्रम घेतले असून शाळेचा पहिला दिवस पालकांकरिता चिरस्मरणीय बनविला होता. 

शाळेच्या पहिला दिवस सर्वच शाळा साजरा करतात. पण, आम्ही हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे स्वागत केल्याने, त्यांच्यासह पालकवर्गात आनंदाचे वातावरण निर्मीत झाले होते. - योगेश पखाले, मुख्याध्यापक, महापालिका शाळा. एसआरपीएफ

टॅग्स :SchoolशाळाAmravatiअमरावती