शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या अचलपूर पालिकेत ४७ कोटींचा घोटाळा ! मानवी हक्क आयोगाच्या आदेशाला केराची टोपली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 15:50 IST

Amravati : अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीत अचलपूर नगरपरिषदेत गेल्या १५ वर्षापासून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीत अचलपूर नगरपरिषदेत गेल्या १५ वर्षापासून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्य मानवी हक्क आयोगाने आदेश देऊनही वर्षभर कोणतीही कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते किशोर केशवराव मोहोड यांनी ५० कार्यकर्त्यांसह १६ फेब्रुवारीपासून मुंबईत मंत्रालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

अचलपूर नगरपरिषदेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असलेल्या विविध लेखाशीर्षांतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा अपहार करण्यात आल्याचा दावा मोहोड यांनी केला आहे. सुमारे ४७ कोटी ४८ लाख रुपयांचा शासकीय निधी इतरत्र वळवून त्याचा कायमस्वरूपी अपहार करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही दाद मागितली होती.

मानवी हक्क आयोगाच्या आदेशाला केराची टोपली?

राज्य मानवी हक्क आयोगाने या गंभीर प्रकरणाची दखल घेत १२ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रधान सचिव (नगरविकास-२) यांना या प्रकरणी चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, वर्ष लोटूनही शासनाने कोणतीही घटनात्मक कारवाई केली नाही. उलट, काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ५० लाख रुपयांची लाच देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोपही मोहोड यांनी नगरविकास विभागाला दिलेल्या नोटीसमध्ये केला आहे.

१६ फेब्रुवारीपासून उपोषण

किशोर मोहोड १६ फेब्रुवारीपासून मंत्रालयाच्या आवारात ५० समर्थकांसह बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी पोलिस महासंचालक व नगरविकास विभागाला कळविले आहे.

"१५ वर्षांपासून दलित वस्तीच्या हक्काचा पैसा लुटला जात आहे. मानवी हक्क आयोगाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे."- केशवराव मोहोड (तक्रारदार)

English
हिंदी सारांश
Web Title : Achalpur Municipality Scam: ₹47 Crore Embezzlement, Human Rights Ignored?

Web Summary : A ₹47 crore scam in Achalpur Municipality's Dalit housing scheme is alleged. Despite Human Rights Commission orders for investigation, no action has been taken. Activist Kishore Mohod threatens hunger strike in Mumbai.
टॅग्स :Amravatiअमरावतीfraudधोकेबाजी