शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

प्रखर उन्हामुळे सुकली दुभाजकांवरील रोपटी

By admin | Updated: April 2, 2016 00:08 IST

उन्हामुळे मनुष्यांच्या अंगाची लाहीलाही होत असतानाच झाडे-झुडूपेदेखील कोमेजू लागली आहेत.

पुरेशा देखभालीची गरज : अन्यथा शहर सौंदर्यीकरणाचे निघणार वाभाडेअमरावती : उन्हामुळे मनुष्यांच्या अंगाची लाहीलाही होत असतानाच झाडे-झुडूपेदेखील कोमेजू लागली आहेत. रस्ता दुभाजकांमध्ये सौंदर्यीकरणासाठी लावलेली झाडे कोमेजू लागली आहेत. झाडांना योग्य वेळी पाणी न मिळाल्यामुळे झाडे सुकायला लागतात. महापालिकेच्या उद्यान विभागाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या झाडांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरातील काही रस्ते महानगरपालिकेचे तर काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्तयारित येतात. रस्त्यांच्या मधोमध असलेल्या दुभाजकांवर सौंदर्यीकरणाच्या दृष्टिकोनातून सुंदर वृक्ष लावण्यात आले आहेत. परंतु या वृक्षांना नियमित पाणी टाकणे गरजेचे आहे. परंतु लाखो रूपये खर्च करून झाडांचे संवर्धन केले जात नाही. इर्विन रुग्णालय ते रेल्वे स्टेशन मार्ग, पंचवटी चौक ते इर्विन रुग्णालय, गाडगेनगर ते कठोरा नाका पंचवटी ते मालटेकडी या मार्गावरील दुभाजकांवर झाडे लावली आहेत. परंतु त्यांच्यावर अवकळा आली आहे. फुटलेल्या कुंड्या केव्हा उचणार? महापालिकाचे स्मार्टसिटीकडे वाटचाल सुरु आहे. पण, काही कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहराचे सौंदर्यीकरण धुळीस मिळत आहे. ठिकठिकाणी फुटलेल्या कुंड्या तशाच पडून आहेत. या कुंड्यांमध्ये काटेरी झाडे वाढलेली आहेत. काही मार्गावरील फुटलेल्या कुंड्या महापालिकेने उचलल्या आहेत. परंतु अनेक मार्गावरील परिस्थिती जैसे थै आहे. सुंदर शहर करण्यासाठी सुंदर वृक्ष लावून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. लावलेली झाडे जगविण्याकरिता महापालिकेने विशेष परिश्रम घ्यावेत, अशी मागणी नागरिकांच्यावतीने केली जात आहे. महापालिकेचे टँकर लावण्यात आले आहेत. उन्हाळ्यात टँकर्सची संख्या वाढविली जाईल. - प्रमोद येवतीकर, उद्यान अधीक्षक, महापालिका .