संजय उदापूरकर क्रिकेट सट्ट्याचा मुख्य बुकी

By admin | Published: May 16, 2017 12:03 AM2017-05-16T00:03:27+5:302017-05-16T00:03:27+5:30

क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या तिघांना अंजनगाव सुर्जी पोलिसांनी अटक केली होती. यातील अरोपींनी कबुली जबाब दिला आहे.

Sanjay Udepurkar Cricket's main bookie | संजय उदापूरकर क्रिकेट सट्ट्याचा मुख्य बुकी

संजय उदापूरकर क्रिकेट सट्ट्याचा मुख्य बुकी

Next

कबुली जबाब : अंजनगावातील बड्यांचा समावेश
सुदेश मोरे । लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या तिघांना अंजनगाव सुर्जी पोलिसांनी अटक केली होती. यातील अरोपींनी कबुली जबाब दिला आहे. या क्रिकेट सट्याचा मुख्य सूत्रधार परतवाडा येथील कुख्यात बुकी संजय उदापूरकर हा आहे. मात्र, अटकेच्या भीतीने पसार झाला आहे. अंजनगाव पोलीस त्याचा शोध घेत आहे. संजय उदापूरकर यास अटक केल्यास क्रिकेट सट्टा चालविणारी अनेक बडी नावे समोर येतील, असा अंदाज पोलिसांना आहे.
दरम्यान कबुली जबाब दिल्यावर अटकेतील आरोपी अनूप आंबेकर, संतोष देशमुख व राहुल कंळबे यांना जामीन मंजूर क रण्यात आला आहे. हे तिनही आरोपी क्रिकेट सट्याचा सूत्रधार संजय उदापुरकरचे एजंट म्हणून काम करीत होते.
क्रिकेट सट्ट्यामधील एजंटनी दिलेल्या कबुली जबाबनंतर संजय उदापुरकरचा शोध घेण्यासाठी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी विशेष पथक तयार केले. त्याच्या अटकेसाठी परतवाडा येथील घरी धाड टाकण्यात आली होती. मात्र, आपल्या एजंटना अटक झाल्याची माहिती मिळताच त्यांनी परतवाडा येथून पलायन केले.
जिल्हाभर संजय उदापूरकर याचे जाळे पसरले असल्याची शक्यता पोलिसांना असून त्या दिशेने तपास केला जात आहे. शुक्रवारी रात्री माहितीच्या आधारावर स्थानिक सावकारपुरा भागात घाड टाकून आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा चालविणाऱ्या तिघांना अटक करून त्यांच्याकडून साडेतीन लाख नगदी व मुद्देमाल यासह सुमारे साडेचार लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.
याप्रकरणी अनूप आंबेकर, संतोष देशमुख व राहुल कंळबे यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी केल्यावर अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सट्टा लावत असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
पोलिसांना कुणी किती रुपयांचा सट्टा लावला व पैशांची देवाण घेवाण कशी करावी, याची माहिती असलेला टेप मिळाला आहे. हा भक्कम पुरावा मानला जात आहे.
या प्रकरणातील संभावित आरोपी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्नात असतील, असा अंदाज पोलिसांना आहे. त्या आधारावर पुढील हालचाली ठरतील, असे मानले जात आहे.

झटपट श्रीमंत होण्यासाठी
या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार नाहीत. पण झटपट श्रीमंत होण्याच्या प्रयत्नातून त्यांनी हा प्रकार केला आहे. ही घटना शहरातील मध्यवर्ती व प्रतिष्ठित लोकांची वस्ती असलेल्या भागात घडली असल्याने याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. सर्व आरोपी तरुण असल्याने त्यांना आमीष दाखवून हे काम करण्यात आले असावे, असाही अंदाज आहे.

अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबाच्या आधारावर याचा सूत्रधार संजय उदापूरकर हा आहे. त्याने पलायन केले असून आम्ही यांचा शोध घेत आहोत. त्याला अटक केल्यावर क्रिकेट सट्ट्याच्या जाळ्याची अधिक माहिती मिळेल.
- सुधीर पाटील, ठाणेदार

Web Title: Sanjay Udepurkar Cricket's main bookie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.