‘कोरोना वॉरियर्स’ना कृतीतून सलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:01 IST2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:01:42+5:30
अमरावती ते परतवाडा मार्गावर वलगाव येथे कयूम शाह हे आपल्या दुचाकीवर एका छोटेखानी डब्यात पंक्चर व किरकोळ दुरुस्तीचे काही साहित्य घेऊन उभे असतात. ग्रामीण भागातून रुग्णांची ने-आण करणारी, पोलीस, कर्मचाऱ्यांची दुचाकी वाहने या मार्गाने जातात तेव्हा त्यांचे पंक्चर व इतर किरकोळ दुरुस्तीची कामे कयूम शाह नि:शुल्क करतात. दुचाकीमागे त्यांनी संपर्कासाठी क्रमांक दिला आहे.

‘कोरोना वॉरियर्स’ना कृतीतून सलाम
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोलीस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार आदी घटक कोरोनाशी दोन हात करीत आहेत. त्यांच्या मदतीसाठी सर्वसामान्य नागरिकांमधून अनेक जण पुढे येत आहेत. यापैकीच एक आहेत वलगाव येथील कयूम शाह. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर असलेल्या कोरोना वॉरियर्सच्या गाड्यांचे पंक्चर ते नि:शुल्क बनवित आहेत.
अमरावती ते परतवाडा मार्गावर वलगाव येथे कयूम शाह हे आपल्या दुचाकीवर एका छोटेखानी डब्यात पंक्चर व किरकोळ दुरुस्तीचे काही साहित्य घेऊन उभे असतात. ग्रामीण भागातून रुग्णांची ने-आण करणारी, पोलीस, कर्मचाऱ्यांची दुचाकी वाहने या मार्गाने जातात तेव्हा त्यांचे पंक्चर व इतर किरकोळ दुरुस्तीची कामे कयूम शाह नि:शुल्क करतात. दुचाकीमागे त्यांनी संपर्कासाठी क्रमांक दिला आहे. त्यावर संदेश मिळाल्यास कुठल्याही ठिकाणी आपले हे चालते-फिरते दुकान नेण्याची त्यांची तयारी असते. तेथेही कोरोना वॉरियर्सकडून कुठलेही पैसे घेतले जात नाहीत. या छोट्याशा कृतीतून कयूम शाह यांनी कोरोना वॉरियर्सना लढण्याचे बळ दिले आहे.