शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

मेळघाटातील वाघांची सुरक्षा दुर्लक्षित, सीबीआय चौकशी का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 6:00 AM

Amravati news tiger राजस्थानातील वाघांच्या शिकारीबाबत सीबीआय चौकशी होते, तर मेळघाटातील वाघांच्या मृतदेहाची का नाही, असाही सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

ठळक मुद्देप्रादेशिक वनविभागाच्या वाघांना आयडी नाही

अनिल कडू

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : मेळघाटात वाघ मरणे आणि मारणे ही नित्याचीच बाब झाली आहे. यात घडत असलेल्या आणि उघडकीस येत असलेल्या घटनांवरून मेळघाटातील वाघांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. राजस्थानातील वाघांच्या शिकारीबाबत सीबीआय चौकशी होते, तर मेळघाटातील वाघांच्या मृतदेहाची का नाही, असाही सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

मृत्यूनंतर सात ते आठ दिवसांनंतर मेळघाटात त्या वाघाचा मृतदेह कधी तरी पुढे येतो. तेव्हा तो मृतदेह सडलेला, कुजलेला असतो. मागील तीन वर्षांत अशाच पाच घटना पुढे आल्या आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील, ढाकणा वनपरिक्षेत्रातील भांडूम बीट अंतर्गत येणाऱ्या कपूरखेडा नाला येथे एका वाघाचा मृतदेह, मृत्यूनंतर तब्बल नऊ दिवसांनी एप्रिल २०१८ मध्ये आढळून आला. याच व्याघ्र प्रकल्पांतर्गत आकोट वनपरिक्षेत्रातील धोंडा आकार राऊंडमधील जीतापूर बीटमध्ये टी-३५ नामक वाघिणीचा मृतदेह, मृत्यूनंतर तब्बल सहा दिवसांनंतर, ३ मार्च २०१९ ला आढळून आला. अंबाबरवामधील टी-२३ नामक वाघाचा मृतदेह लागूनच असलेल्या मध्य प्रदेशातील सिमेत मृत्यूनंतर १५ दिवसांनंतर एप्रिल २०२० मध्ये उघडकीस आला.

रायपूर वनपरिक्षेत्रातील माडीझडप परिसरात मृत्यूनंतर पाच दिवसांनी २० जानेवारी २०२१ ला वाघाचा मृतदेह आढळून आला. तत्कालीन प्रादेशिक पूर्व मेळघाट वनविभागात चिखलदरा वनपरिक्षेत्रातील मोथा परिसरात मृत्यूनंतर तब्बल १५ दिवसांनी जानेवारी २०१९ मध्ये एका वाघाचा मृतदेह आढळून आला. यातील काही कुजलेल्या वाघाच्या मृतदेहाचे काही अवयव प्रयोगशाळेतही पाठविले जातात. वाघ मरतात, सडतात, कुजतात. या मृत वाघांच्या फायली बनविण्यात येतात आणि पुढे या घटना फाईलबंद केल्या जातात.

वाघाला आयडी नाही

व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या प्रादेशिक वनविभागाच्या जंगलातही वाघ आहेत. ज्या प्रादेशिक वनविभागात वाघ आहेत त्या वाघांना ओळख नाही. आयडी नाही. त्यामुळे ते बेवारस ठरत आहेत हे मोथा आणि रायपूरमध्ये आढळून आलेल्या वाघांच्या मृतदेहाकडे लक्ष वेधल्यास पुरेसे ठरले आहेत.

‘त्या वाघांचे पुढे काय?

वाघांच्या शिकारीच्या अनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने २०१८ मध्ये एक गुन्हा उघडकीस आणला. यात सन २०१७ आणि २०१८ या दोन वर्षांत चार वाघ आणि एका बिबटाची शिकार प्रादेशिक वनविभागाच्या अंजनगाव सुर्जी वनपरिक्षेत्रातील केल्याची कबुली खुद्द आरोपींनी दिली. पूर्व मेळघाट वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पराड यांचे समक्ष ते आरोपींचे बयाण घेण्यात आले. ही चौकशी गुंडाळून प्रकरण फाईलबंद केल्या गेले.

सीबीआय चौकशीची मागणी

सन २००५ मध्ये मनमोहनसिंग असताना राजस्थानमधील सिरस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघांची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. सन २००९ मध्येही भंडारा, चंद्रपूरकडील वाघांच्या शिकारींची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली. याच धर्तीवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या शिकारी आणि आढळून येत असलेल्या वाघांच्या मृतदेहांची चौकशी सीबीआयकडून करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.

टॅग्स :Tigerवाघ