शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

साद्राबाडीत दहशत कायम रोजगारही हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:18 IST

साद्राबाडीसह लगतच्या पाच गावांमध्ये दोन आठवड्यानंतरही नागरिक जीव मुठीत घेऊन राहात असल्याचे वास्तव आहे. दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले अन् रोजगारही हिरावला गेला. धक्क््यांची कमी होत असलेली तीव्रता हा दिलासा मानला तरी भूकंपाची दहशत नागरिकांच्या मानगुटीवर आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा केवळ धीर दिला जात आहे. याने पोट भरेल काय, हा आदिवासी बांधवांचा सवाल आहे.

ठळक मुद्देदोन आठवड्यानंतरही स्थिती जैसे थै : दिनचर्या विस्कळीत, संसार उघड्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : साद्राबाडीसह लगतच्या पाच गावांमध्ये दोन आठवड्यानंतरही नागरिक जीव मुठीत घेऊन राहात असल्याचे वास्तव आहे. दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले अन् रोजगारही हिरावला गेला. धक्क््यांची कमी होत असलेली तीव्रता हा दिलासा मानला तरी भूकंपाची दहशत नागरिकांच्या मानगुटीवर आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा केवळ धीर दिला जात आहे. याने पोट भरेल काय, हा आदिवासी बांधवांचा सवाल आहे.साद्राबाडी, झिल्पी, गावलानडोह, पाथरपूर, सुसर्दा व राणीपिसा आदी गावांची दिनचर्याच या पंधरवड्यात बदलली. २१ आॅगस्टच्या मोठ्या धक्क्यानंतर गावातील अनेक घरांना तडे गेलेत. या ठिकाणी प्रशासन राहू देत नाही. तंबूत दिवस कसे काढावे, या विवंचनेत नागरिक आहेत. गावाला जो-तो भेट देत असल्याने जणू पर्यटनाचे स्वरूप आले. या प्रत्येकाशी बोलताना दहशतीत असलेला आदिवासी बांधव आणखीन भेदारला गेला. त्यांचे फोटोसेशन होत आहेत, तर पुढ कसं, या प्रश्नाने आदिवासींच्या जिवाची घालमेल होत आहे.मुलांच्या शाळा होत आहेत. पण शैक्षणिक भविष्य आहे काय? धक्क्यांनी मोठ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, तिथे चिमुकल्यांकडून अपेक्षा तरी किती करणार? गुरुजीच जीव मुठीत घेऊन शाळेत येतात. सुरुवातीला तर मुलेच शाळेत जायला धजावले नाहीत. पीएचसीच्या इमारतीला तडे गेल्याने उपचार तंबूत सुरू आहेत. साधारणपणे पाच हजार नागरिक बाधित आहेत. दोन हजारांवर गाव सोडून इतरत्र आश्रयाला गेले आहेत. अचानक कोणी आजारी पडले, तर १५-२० किमी अंतरावरील धारणीशिवाय पर्याय नाही. २०१३ मध्ये अशाच भूगर्भातील हालचाली झाल्यात. या पाच वर्षात या ठिकाणी काय सुविधा उभारल्या, याचे उत्तर आज प्रशासनाजवळ नाही. धक्क्यांची तिव्रता कमी होईल, अहवालही सादर होईल, पुन्हा कागदी घोडे नाचतील, त्यापुढे काय, याचे उत्तर प्रशासनाच द्यावे लागणार आहे.एमपीमधील पंधनामध्ये दशकापूर्वी हीच स्थितीसाद्राबाडीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील पंधना तालुक्यात १९९७-९८ मध्ये अशाच प्रकारे भूगर्भातून आवाज यायचे. यावेळीदेखील जीएसआयची चमू दाखल झाली होती. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत हा प्रकार झाला होता. याची तीव्रता ही २ रिश्टर स्केलपर्यत होती. भूगर्भात पाणी झिरपल्यानेच वायूची हालचाल होऊन असे प्रकार होत असल्याचा निष्कर्ष निघाल्याचे जीएसआयच्या सूत्राने सांगितले.दोन्ही पथकांना माध्यमांशी बोलण्यास बंदीसाद्राबाडी येथे नागपूर येथील जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया (जीएसआय) तसेच दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्रॉफ (एनसीएस) चमू दाखल आहेत. माध्यम प्रतिनिधींशी बोलण्यास जिल्हा प्रशासनाने मनार्ई केल्याची माहिती जीएसआय पथकातील तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे साद्राबाडी येथे भूगर्भात नेमके काय सुरू आहे याची माहिती जिल्हा प्रशासन दडवित तर नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.साद्राबाडीत नागरिकांशी संवाद साधून शंकाचे निरसन करण्यात आले. येथे उपस्थित दोन्ही पथकांशी चर्चा केली. दिवसेंदिवस धक्क््यांची तीव्रता कमी होत आहे. उशिरापर्यंत अहवाल अपेक्षित आहे.- के. पी. परदेशीअपर जिल्हाधिकारीभूगर्भात झिरपलेल्या पाण्याने पोकळी भरत असल्याने ही हालचाल होत आहे. तीन यंत्रांच्या आठ दिवसांच्या नोंदींच्या अभ्यासानंतरचा निष्कर्ष व अहवाल डीएमकडे सादर करण्यात येईल.- मिलिंद धकातेसंचालक, भूकंपविज्ञान विभाग