शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबा ट्रस्टच्या वार्षिक अहवालात घोळ

By admin | Updated: October 11, 2015 01:37 IST

साईनगरातील श्री साईबाबा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयात दिलेल्या वार्षिक अहवालात घोळ केल्याचा आरोप माहिती ...

माजी व्यवस्थापकांचा आरोप : न्यायालयीन प्रकरण, तक्रारीचा हवालाअमरावती : साईनगरातील श्री साईबाबा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयात दिलेल्या वार्षिक अहवालात घोळ केल्याचा आरोप माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीवरून माजी व्यवस्थापक अविनाश ढगे यांनी केला आहे. त्यातच ट्रस्टने विलंब झालेल्या अहवालाला न्यायालयीन प्रकरणे व भक्तांच्या तक्रारीला हवाला दिला. साईबाबा ट्रस्टने उत्पन्नाचा अहवाल धर्मदाय आयुक्त कार्यालयात विलबांने सादर केला. विलंब झाल्याची स्पष्ट लेखी कबुली दिल्याचा पुरावा माहितीच्या अधिकारात ढगे यांच्या हाती लागला आहे. चुकीच्या धोरणामुळे लागलेल्या विलंबाला व न्यायालयीन प्रकरणे व भक्तांच्या दानाची रक्कम निरर्थक खर्च होत असल्याचा आरोप ढगे यांनी केला आहे. ट्रस्टतर्फे धर्मदाय आयुक्त कार्यालयात दिलेल्या अहवालाच्या विवरणात तफावत आढळली असतानाही ट्रस्टवर कारवाई करण्याऐवजी संशयास्पद अहवालातील नोंदींना मान्यता दिल्याने धर्मदाय आयुक्त कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात आहे. वार्षिक अहवालाच्या अनुसूची १० मधील नोंदीत २००३-०४ नंतर थेट २०००६-०७ चे विवरण देण्यात आले आहे. त्यानंतरही काही वर्षाच्या विवरणाच्या आकडेवारीत तपावत असल्याचे अहवालावरून उघड झाले. त्यामुळे वार्षिक हिशेबात प्रचंड अनियमितता असल्याचा ढगे यांनी माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीवरून उघड केले. साईबाबा ट्रस्ट सार्वजनिक ट्रस्ट असून धर्मदाय आयुक्त कार्यालयाने ट्रस्टच्या अंधाधुंद कारभारावर अंकुश लावावा, अशी मागणी माजी व्यवस्थापक ढगे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.