शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

रेती वाहतुकीवर धाडी

By admin | Updated: December 6, 2014 22:37 IST

‘वाळू तस्करी’ बाबतची वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित करताच महसूल विभाग खडबडून जागा झाला. शुक्रवारी रात्री महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळू वाहतूक रोखण्यासाठी सापळा रचला.

सात ट्रक पकडले : अखेर महसूल विभागाला आली जागअमरावती : ‘वाळू तस्करी’ बाबतची वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित करताच महसूल विभाग खडबडून जागा झाला. शुक्रवारी रात्री महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळू वाहतूक रोखण्यासाठी सापळा रचला. अखेर सात ट्रक पकडण्यात महसूल कर्मचाऱ्यांना यश आले. महसूल विभागाच्या या कारवाईनंतर जिल्ह्यात बोकाळलेल्या निरंकुश वाळू वाहतुकीवर शिक्कामोर्तबच झाले आहे. मध्यरात्री घालणार गस्त नदी, नाल्यातून वाळू उपस्याला बंदी असताना दरदिवसाला सुमारे ५०० ट्रकद्वारे शहरात अर्वैध वाळू वाहतूक होत असल्याचे वास्तव आहे. मात्र हा प्रकार महसूल विभाग मूकपणे बघत होता. वाळू तस्करीत महसूल, पोलीस, आरटीओ अशी साखळी असल्यामुळे कारवाई करणार कोण? ही खरी बाब होती. परंतु जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची अवैध वाळू वाहतूक प्रकरणी कानउघाडणी करताच मागील दोन दिवसापासून वाळू तस्करीला रोखण्याचे पाऊल उचलल्या गेले आहे. शुक्रवारी रात्री चांदुर रेल्वे, छत्री तलाव मार्ग, वलगाव, भातकुली मार्गावर वाळू वाहतुकीला लगाम लावण्यासाठी विशेष पथकाने धाडसत्र राबविले. यात अवैधरित्या वाळू उपसा करुन ती वाळू विक्रीसाठी नेली जात असताना सात ट्रक पकडण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर या ट्रक चालकांवर दंडात्मक कारवाई करणफयात आली आहे. उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे हे रात्रीला गस्त घालीत असून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना लगाम लावण्यासाठी ‘जागते रहो’ चे कर्तव्य बजावत आहेत. अवैधरित्या वाळू वाहतूक करुन लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार, हा सुद्धा खरा सवाल आहे. परंतु अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी सरसावले आहेत. वाळू तस्करी रोखण्याचा हा शिरस्ता असाच सुरु राहिला तरच महसूल बुडण्यापासून वाचेल, अन्यथा दोन दिवस थातुरमातुर कारवाईचे सोंग दाखवून वाळू तस्करी रोखता येणार नाही, हे वास्तव आहे. महसूल विभागाने छोट्याशा रक्कमेसाठी कर्तव्य न विसरता वाळूमध्ये होत असलेल्या फसवणुकीचा लेखाजोखा बघितला तर त्यांच्या लक्षात येईल. वाळू तस्कर कोट्यधीश झाले असून हे सर्व महसूल, पोलीस आणि आरटीओंच्या मेहरबानीनेच सुरु आहे.