मॉडीफाईड सायलेन्सरवर फिरणार रोलर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:12 AM2021-09-13T04:12:41+5:302021-09-13T04:12:41+5:30

प्रदीप भाकरे अमरावती : बुलेट किंवा तत्सम वाहनांच्या सायलेंसरमध्ये बदल करून रणगाड्यासारखा धडधड आवाज करीत जाणाऱ्या बुलेटवीरांवर ...

Roller to rotate on modified silencer! | मॉडीफाईड सायलेन्सरवर फिरणार रोलर !

मॉडीफाईड सायलेन्सरवर फिरणार रोलर !

Next

प्रदीप भाकरे

अमरावती : बुलेट किंवा तत्सम वाहनांच्या सायलेंसरमध्ये बदल करून रणगाड्यासारखा धडधड आवाज करीत जाणाऱ्या बुलेटवीरांवर वाहतूक शाखेने दंडाचा बडगा उगारला आहे. ध्वनीप्रदूषणात भर घालणार्या त्या मॉडीफाईड बुलेट सायलेन्सरवर रोडरोलरदेखील फिरविला जाणार आहे.

रस्त्याने जोराचा आवाज करीत भरधाव जाणाऱ्या बुलेट सध्या नागरिकांची डोकेदुखी ठरत आहेत. दुरूनच या वाहनांचा आवाज यायला लागतो आणि ती जवळ आली की रस्त्यावरील अन्य दुचाकीचालक विशेषतः वृद्ध आणि शालेय विद्यार्थी घाबरून भांबावून जातात. त्यातूनच छोटे-मोठे अपघात होत असतात. शहरात कॅम्प, पंचवटी, शिवाजीनगर, व्हीएमव्ही रोड, कठोरा रोड या मार्गावर अशा दुचाकीस्वारांचा धुमाकूळ असतो. अशांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील १५ दिवसांत २७ वाहनांचे मॉडीफाईड सायलेंसर काढून घेऊन त्यांच्याकडून प्रत्येकी १ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मॉडीफाईड सायलेंसर काढून त्याऐवजी दुसरे आवाज न करणारे सायलेंसर लावून घेतल्यानंतरच ती वाहने सोडण्यात येत आहेत.

////////////

सायलेंसरवर ५ हजारांचा खर्च

दुचाकीतून विशिष्ट आवाज येण्यासाठी सायलेंसरमध्ये काही बदल घडवून आणण्यात येतात. त्यासाठी ४ ते ५ हजार रुपये खर्च केले जातात. दरम्यान पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे या चालकांना धाक बसल्याचे दिसत आहे. २०२१ च्या ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात २७ वाहनांचे मोडीफाईड सायलेंसर काढण्यात आले. मोटार वाहन कायद्यातील १९० (२) या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली. या नियमानुसार १००० रुपये दंड होऊ शकतो. जबर दंड बसल्याशिय अशा दुचाकीचालकांना कायद्याचा धाक बसणार नाही.

////////////

३३ लाखांची बाईक चालविणारा ‘टार्गेट’

एका तरुणाने तब्बल ३३ लाख रुपयांची दुचाकी घेऊन शहरात धूम माजविली आहे. शहरातील तीनही उड्डाणपूल, पंचवटी ते इर्विन चौक, चपराशीपुरा ते रेल्वे स्टेशन चौकातून तो शहरभर प्रचंड आवाज करणारे मॉडीफाईड सायलेंसर बसवून फिरत असतो. त्याच्या बेदरकार वेगाबाबत शहर वाहतूक शाखेकडे तक्रारदेखील आली आहे. त्यामुळे तो ‘बुलेटराजा’ पोलिसांच्या रडारवर आला आहे.

////////////

कोट

शहरात ध्वनीप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांसंदर्भात वाहतूक शाखेकडे तक्रारी आल्यात. सबब, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या व मॉडीफाईड सायलेंसरवर कारवाई करण्यात येत आहे. ज्यांनी आपल्या बुलेटला मॉडिफाईड सायलेंसर लावून घेतले, त्यांनी ते स्वत:हून काढून टाकावेत.

- बाबाराव अवचार,

पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

Web Title: Roller to rotate on modified silencer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.