शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

‘रोहयो’चा पूरक कृती आराखडा १०२२ कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा परिषदेने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा चालू आर्थिक वर्ष सन २०२०-२२चा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : जिल्हा परिषदेने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा चालू आर्थिक वर्ष सन २०२०-२२चा सुमारे १,०२२ कोटी ०२ लाख ४१ हजार रूपयांचा पूरक कृती आराखडा तयार केला आहे. तर सन २०२१-२२ या वर्षाचा मूळ कृती आराखडा ४३९३.३३ लाख ४४ हजार रूपयांचा तयार केला आहे. या आराखड्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. या आराखडयात शेततळी, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, सिंचन विहीर, पाझर तलाव दुरूस्ती, अंगणवाडी बांधकाम, गाेठा, गांडूळ खत अशी पूरक आराखड्यातील ९१,०५० एवढी कामे प्रस्तावित केली आहेत. यामुळे ३ कोटी ०१ लाख ७९ हजार ८११ संभाव्य मनुष्य दिन निर्मिती होणार असून, हा आराखडा १,०२२ कोटींचा पूरक आराखडा आहे. याशिवाय सन २०२१-२२ या वर्षाच्या मूळ कृती आराखडयात २ लाख ७३ हजार ०७ एवढी कामे प्रस्तावित केली आहेत. यामुळे २० कोटी ४१ लाख २२ हजार ४४४ संभाव्य मनुष्य दिन निर्मिती होणार आहे. हा मूूळ आराखडा ४,३९३ कोटी ३३ लाख ४४ हजारांचा आहे. यामुळे जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पुढील वर्षातील कामांचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्यात रस्ते, वृक्षलागवड व संगोपन, सिंचन विहीर, जलसंधारणविषयक कामे (सीसीटी, लूजबोल्डर, शेतबांध बंदिस्त) फळबाग, रेशीम लागवड, रोपवाटिका, गांडूळ खत प्रकल्प, गोठे, शेळीपालन, कुक्कटपालन शेड, घरकुल, शौचालय अंतर्गत कामे यासोबतच अन्य कामेदेखील करण्यात येणार आहेत.

बॉक्स

गत दहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अशा कठीण परिस्थितीत शासनाने रोजगार हमी योजनेला मंज़ुरी दिल्याने ग्रामीण भागात उदरनिर्वाहासाठी हाताला काम मिळणार आहे. सध्या अर्थचक्र मंदावल्यामुळे या कामांना गती मिळावी, म्हणून शासनाने ‘रोहयो’ची कामे सुरू करण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळणार असून, या कामांचा गावांना फायदा होणार आहे.

कोट

जिल्ह्यात ‘रोहयो’ची कामे सुरू झाली आहेत. या कामांच्या माध्यमातून सर्वस्तरातील मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याने दिलासा मिळाला आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये मजुरांना कामाची आवश्यकता आहे, त्यांना मागणीनुसार कामे उपलब्ध करून देऊ.

प्रवीण सिन्नारे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

रोहयो विभाग, जिल्हा परिषद