शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

‘रोहयो’ सर्वाधिक भ्रष्टाचारी योजना!

By admin | Updated: December 9, 2015 00:30 IST

‘एसीबी’कडून शिक्कामोर्तब : इंदिरा आवास दुसऱ्या क्रमांकावर

प्रदीप भाकर अमरावतीराज्य शासनाकडून राबविले जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये रोजगार हमी योजना भ्रष्टाचारात अग्रमानांकित ठरली आहे. इंदिरा आवास योजनाही भ्रष्टाचारत बरबटल्याचे उघड झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यातील ४० योजना कार्यालयाशी संबंधित असलेल्या सापळ्याप्रकरणी वार्षिक गोषवारा जाहीर केला आहे. रोजगार हमी योजना, इंदिरा आवास योजना, घरकूल योजना या पहिल्या तीन क्रमांकाच्या भ्रष्टाचारी योजना ठरल्या आहेत. सन २०१४ आणि २०१५ या दोन वर्षांत ४० योजनेशी निगडित १३६ सापळे रचण्यात आले. २०१४ मध्ये ८५ तर २०१५ मध्ये ५१ सापळे यशस्वी करण्यात आले. या ४० योजनांमध्ये पाणीपुरवठा, आम आदमी विमा योजना, जीवनदायी योजना, शेळीपालन, एकात्मिक बालविकास, अपंगवित्त महामंडळ, दलित वस्ती सुधार योजना, ग्रामस्वयं रोजगार योजना, महिला बचतगट, पाणलोट विकास कार्यक्रम, आदिवासी योजना, अंत्योदय, भाग्योदय, वीज भांडवल योजना, कामगार विमा योजना, गारपीट योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान आदींचा समावेश आहे. रोजगार हमी योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविली जाते. ग्रामपंचायत स्तरावर जॉबकार्ड आदी प्रक्रिया त्यासाठी पार पाडल्या जातात. यातील वेतन काढण्यासाठी तथा देयके करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाचेची देवाण-घेवाण केली जात आहे. ग्रामीण भागात तर योजनेतील लाचखोरीमुळे या योजनेला ‘रोजगार हमी-अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’ असे म्हटले जाते.दोन वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ सापळे यशस्वी केल्याच्या पार्श्वभूमिवर रोहयोमधील सर्वाधिक लाचखोरीवर एसीबीने शिक्कामोर्तबच केले आहे. इंदिरा आवास योजनेमध्ये दोन वर्षांत १९, तर त्यामागोभाग घरकूल योजनेमध्ये १४ लाचखोरांना एसीबी खात्याने जेरबंद केले आहे. (प्रतिनिधी)