शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या ठिय्याने रस्ता बांधणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:15 IST

वनविभागाचे अधिकारी आल्यापावली परतले: पोलिसांचा बंदीबस्त परतवाडा : रस्ता मंजूर होऊनसुद्धा वनाधिकारी रस्त्याचे काम केल्यास गुन्हे दाखल करण्याची धमकी ...

वनविभागाचे अधिकारी आल्यापावली परतले: पोलिसांचा बंदीबस्त

परतवाडा : रस्ता मंजूर होऊनसुद्धा वनाधिकारी रस्त्याचे काम केल्यास गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचे पाहून शनिवारी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी खुद्द जंगलात खुर्ची टाकून दिवसभर ठिय्या दिला. परिणामी, सार्वजनिक बांधकाम विभागाला परतवाडा धारणी इंदूर या आंतरराज्यीय मार्गावरील १६ किलोमीटर मंजूर रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली. पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा तैनात होता. दुसरीकडे रस्त्याचे काम बंद करण्यासाठी दोन वेळा आलेला वनाधिकाऱ्यांचा ताफा आल्यापावली परतला.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि वनविभागाच्या जाचक अटी-शर्तींमुळे दोन वर्षांपासून रस्त्यांची कामे रखडली आहेत. वारंवार परवानगी व विनंती पत्र देऊनसुद्धा वनाधिकारी गुन्हे दाखल करण्याचे धमक्या देत असल्याने मेळघाटातील रस्ते पूर्णत: खड्डेमय झाले आहेत. त्यावर कळस म्हणजे, शासनाने मंजूर केलेला कोट्यवधीचा निधी परत जाण्याची भीती वर्तविला जात आहे. या सर्व रस्त्यांची मालकी सातबारावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. वारंवार सांगूनही रस्त्याच्या कामात अडथळा येत असल्याने मेळघाट आमदार राजकुमार पटेल यांनी शनिवारी खुद्द रस्त्यावर टेबल-खुर्ची टाकून पहिल्या टप्प्यात मंजूर असलेल्या लवादा ते बोरी या १६ किलोमीटरच्या रस्ता कामाला सुरुवात करून घेतली. दिवसभरात काही किलोमीटरचा रस्ता शनिवारी एका बाजूने तयार झाला. धारणी ते परतवाडा मुख्य रस्ता बांधकामावेळी धारणीचे उपअभियंता रा.रा माळवे, शाखा अभियंता नीलेश खडसने, कंत्राटदार हाजी इशाकभाई आदी उपस्थित होते.

-------