शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

अमरावती जिल्ह्यात बोंड अळीच्या तक्रारींचा वाढता ओघ, नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 17:24 IST

जिल्ह्यात कपाशीचा पेरा वाढला असतानाच यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बीटीवर बोंडअळी येत नसल्याचा दावा फोल ठरल्याने बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतक-यांनी कृषी विभागाकडे तक्रार करणे सुरू केले असून, मागील दोन दिवसांत जिल्ह्यात १ हजार ५०० हून अधिक तक्रारी प्राप्त आहेत. 

- वीरेंद्रकुमार जोगी अमरावती : जिल्ह्यात कपाशीचा पेरा वाढला असतानाच यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बीटीवर बोंडअळी येत नसल्याचा दावा फोल ठरल्याने बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतक-यांनी कृषी विभागाकडे तक्रार करणे सुरू केले असून, मागील दोन दिवसांत जिल्ह्यात १ हजार ५०० हून अधिक तक्रारी प्राप्त आहेत. जिल्ह्यात यंदा २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड केली. उशिरा व अनियमित पावसामुळे बहुतांश शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. हिमतीने पिके जोपासल्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाच्या पाहणीत पिकांवर ९६ टक्क््यांपर्यंत बोंडअळी असल्याचे निष्पन्न झाले. याच दरम्यान शेतक-यांनी बोंडअळीसंदर्भात तक्रारी करण्यास सुरुवात केली. मागील दोन दिवसांत संपूर्ण जिल्ह्यातील कपाशी उत्पादकांनी बीटी बियाण्यासंदर्भात दीड हजारांहून अधिक तक्रारी दाखल केल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील असून, ५४५ तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यात, तर वरूड तालुक्यात सर्वांत कमी दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व भातकुली तालुक्यात बोंडअळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यात एकही तक्रार नाही. मात्र, चिखलदरा तालुक्यात ४३२ हेक्टरवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे कृषी अधिका-यांनी सांगितले. बीटी कंपन्यांची तपासणी करागत दोन वर्षांच्या तुलनेत कपाशीचा पेरा यंदा जादा झाल्याने शिल्लक असलेले बियाणे कंपन्यांनी विक्रीस काढले. बीटी बियाणे कंपन्यांच्या प्रयोगशाळांची तपासणी करावी. बियाणे विक्रीचा रेकार्ड तपासावा, रॉयल्टीविषयी माहिती घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  उभ्या पिकात फिरविला नांगर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी उभ्या पिकात नांगर फिरविला. उत्पादन होणार नसेल तर काय उपयोग, असे म्हणत शेकडो शेतक-यांनी रबी पिकासाठी जमीन मोकळी केली. कपाशीची मोड करायच्या विचाराने दर्यापूर तालुक्यातील शिंगणापूर येथील भानुदास देशमुख या शेतकºयाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. 

बोंडअळी बाधित शेतक-यांना खरोखरच मदत करायची असेल, तर महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करून सरसकट मदत जाहीर करावी. केवळ तक्रारी जमा करून काहीच होणार नाही. - जगदीशनाना बोंडे,शेतकरी नेते, अमरावती 

तालुकानिहाय तक्रारी तालुका     तक्रारी अचलपूर     ३३अंजनगाव सुर्जी     २६३भातकुली     २९०चांदूर रेल्वे     २५५चांदूर बाजार     १४४धामणगाव रेल्वे     २७२दर्यापूर         १७३नांदगाव खंडेश्वर     ५४५मोर्शी         ४३तिवसा        १८वरूड         ०२

टॅग्स :Amravatiअमरावती