शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्करी उघड केल्याचा सूड ; ढाब्यासह वाहनं, रोकड केली खाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:02 IST

"श्रीकांत जयस्वाल यांचा ढाबा जाळला : अडीच लाखांची रोकडही जळाली!

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : पोलिसांना ढाब्यात बसवून का ठेवता, तुमच्यामुळे आमचे धंदे खराब झाले आहेत, असे म्हणत अख्खा ढाबा २० लिटर पेट्रोल ओतून जाळून टाकल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या जाळपोळीमध्ये ढाबा संचालकाच्या मालकीची कार, दुचाकी, सायकल, अडीच लाख रुपये रोख तसेच संपूर्ण साहित्याची राखरांगोळी झाली. एकूण २५ लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार धारणी पोलिस ठाण्यात देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अशोक जाधव, पोलिस उपनिरीक्षक सतीश झालटे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

धारणीपासून १८ किलोमीटर अंतरावरील बिजूधावडी ते ढाकणा मार्गालगत श्रीकांत लालबहादूर जयस्वाल (३८) यांच्या ढाब्याची जाळपोळ करण्यात आली. श्रीकांत जयस्वाल हे पत्नी, मुलगा आणि मुलीसमवेत येथेच वास्तव्याला होते. पोलिसांना रेती तस्करीची माहिती देत असल्याचा आरोप सोमवारी रात्री ढाब्यात शिरलेल्या लगतच्या गडगामालूर या गावातील पाच इसमांनी केला. श्रीकांत व त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यात आली. सोबत आणलेल्या कॅनमधील २० लिटर पेट्रोल ढाबा परिसरात ओतून आग लावण्यात आली. श्रीकांत यांनी मुलगा प्रिन्स (१०) याला मोठ्या मुश्किलीने आरोपींच्या तावडीतून सोडवून बाहेर काढले आणि कसेबसे पोलिस ठाणे गाठले. आगीत ढाबा जळून खाक झाला. पुढ्यात असलेली कार आणि दुचाकीही जळाली. पाणी प्यायला ग्लासदेखील शिल्लक राहिलेला नाही.

पोलिसांनाही शिवीगाळ, पलायन...जाळपोळीपूर्वी दोन पोलिस कर्मचारी सामिष भोजनाकरिता आले होते. त्यांनी जेवण सुरू होण्यापूर्वीच जाळपोळ करण्यात आली. आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ व मारहाण केल्याची माहिती आहे. आरोपी तुल्यबळ ठरल्याने दोन्ही पोलिसांनी घटनास्थळाहून पळ काढल्याचे ढाबा संचालक श्रीकांत जयस्वाल यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

रोकडने घेतला पेट....ढाब्यामध्ये रोख रकमेसाठी ठेवण्यात आलेल्या दोन पेट्यांमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल होते. त्या संपूर्ण नोटा जळून खाक झाल्या. एकूण अडीच लाख रुपयांची ही रक्कम होती, असे तक्रारीत नमूद आहे.

चौघांना अटक...गजानन ऊर्फ दिलीप बाबू पाटील खडके (३३), राजा ऊर्फ कृष्णा बाबू पाटील खडके (२९), गणेश ऊर्फ बाला बाबू पाटील खडके (२८) व उत्तम बलदेव पाटील खडके (२५) या चौघांना प्रकरणात अटक करण्यात आली आहे, तर पवन पाटील खडके नामक आरोपी पसार झाला आहे. यापैकी राजा ऊर्फ कृष्णच्हा पश्चिम बंगाल राज्यात रेल्वे पोलिसात कार्यरत असून तो मुख्य सूत्रधार असल्याची माहिती ठाणेदारांनी दिली. मारहाण, खुनाचा प्रयत्न तसेच आर्म्स अॅक्ट अन्वये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावतीsandवाळूmafiaमाफिया