अमरावतीत खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात निवृत्त पोलीस कर्मचारी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 13:26 IST2022-09-13T13:26:00+5:302022-09-13T13:26:13+5:30
नवनीत राणा उटसुट पोलिसांवर बेछूट आरोप करतात पोलिसांची नाहक बदनामी करतात.

अमरावतीत खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात निवृत्त पोलीस कर्मचारी आक्रमक
अमरावती - अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात पाच दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालून राडा घातलेला होता. त्यामुळे नवनीत राणा यांचा सर्व स्तरावरून विरोध होत असताना आज अमरावती पोलिसांच्या समर्थनार्थ निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. त्यांनी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन पोलीस आयुक्त अर्ज सिंग यांच्याकडे निवेदन दिले.
नवनीत राणा उटसुट पोलिसांवर बेछूट आरोप करतात पोलिसांची नाहक बदनामी करतात. त्यामुळे नवनीत राणांनी पोलिसांची बदनामी थांबवावी व राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यासोबत घातलेल्या राडा प्रकरणी नवनीत रानावर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी केली.