शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
2
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
3
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
6
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
7
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
14
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
15
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
16
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
17
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
18
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
19
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
20
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र पुरस्कृत कृषी योजनांची होणार पुनर्रचना

By admin | Updated: May 19, 2014 22:59 IST

हवामानातील बदलत्या वातावरणाशी सुसंगत नवीन कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्यासह देशभरात शाश्‍वत शेती अभियान राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने शेवटच्या टप्प्यात मंजूर केला आहे.

अमरावती : हवामानातील बदलत्या वातावरणाशी सुसंगत नवीन कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्यासह देशभरात शाश्‍वत शेती अभियान राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने शेवटच्या टप्प्यात मंजूर केला आहे. या निर्णयानुसार केंद्र पुरस्कृत योजना एकत्रितपणे राबविल्या जाणार आहेत. यासाठी राज्य व जिल्हास्तरावर विविध समित्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियान सक्षम करण्याचा उद्देश आहे.

सन २0१४-१५ पासून मावळत्या केंद्र शासनाने शेतीशी संबंधित विविध योजनांची पुनर्रचना केली. यापैकी काही योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय सुक्ष्म सिंचन अभियान, राष्ट्रीय सेंद्रीय शेती प्रकल्प, राष्ट्रीय मृदा आरोग्य व सुपिकता व्यवस्थापन प्रकल्प आणि कोरडवाहू शाश्‍वत शेती कार्यक्रमाचा समावेश आहे. योजनांच्या माध्यमातून हवामान बदलांशी सुसंगत कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियान राबविण्यात येईल. अभियानाच्या माध्यमातून कोरडवाहू क्षेत्रविकास, शेती, जलव्यवस्थापन, मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि वातावरण बदल व शाश्‍वत शेती संनियंत्रण या घटकांचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्य आणि जिल्हास्तरावर विविध समित्यांची स्थापना करण्याचे सुचविले आहे. त्यानुसार राज्य शासनस्तरावर राज्यस्तरीय समिती, राज्यस्तरीय स्थायी तांत्रिक समिती, जिल्हास्तरीय अभियान समिती, राज्यस्तरीय तांत्रिक सहायता चमू नियुक्त समिती आणि जिल्हास्तरावर विषय विशेषज्ञ नियुक्ती समिती स्थापन करणे प्रस्तावित होते. राज्य शासनाने यासंदर्भात एका निर्णयाद्वारे नुकतीच या समित्यांची घोषणा केली आहे. (प्रतिनिधी)