अपात्र उमेदवारांची बीडीओंकडून शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 21:00 IST2017-09-16T21:00:22+5:302017-09-16T21:00:42+5:30

शासनाच्या नवीन आदेशानुसार प्रत्येक ग्रामपंचायत फ्रेन्चायशी स्वरुपात विद्युत सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील ४९ पैकी ४० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.

Recommendations by ineligible candidates from BDO | अपात्र उमेदवारांची बीडीओंकडून शिफारस

अपात्र उमेदवारांची बीडीओंकडून शिफारस

ठळक मुद्देविद्युत सेवकांची नियुक्ती : ४९ पैकी ४० ग्रामपंचायतींचे प्रस्ताव न पाहताच पाठविले

प्रभाकर भगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूररेल्वे : शासनाच्या नवीन आदेशानुसार प्रत्येक ग्रामपंचायत फ्रेन्चायशी स्वरुपात विद्युत सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील ४९ पैकी ४० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. यात सातवी पास झालेल्याची ग्रामपंचायतीने शिफारस केल्याचे उघड झाले आहे.
पंचायत समितीच्या बीडीओंनी त्यात सुधारणा न करता जशीच्या तशीच यादी जिल्हा परिषदेला सादर केली आहे. त्या दोन उमेदवारांजवळ आयटीआय प्रमाणपत्र नसतानाही पंचायत समितीचे प्रशासन किती पारदर्शक आहे, त्याचा हा पुरावाच म्हणावा लागेल.
महाराष्टÑ शासनाच्या निर्णयानुसार विशिष्ट अटीवर फ्रेन्चायशी म्हणून विद्युत सेवक नेमण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार ग्रामपंचायतीने कोणती कामे करावी हेही त्यात नमूद आहे. वीज सेवक नेमताना एसएससी. व आयटीआय (ईले.) डिप्लोमा असणे अनिवार्य आहे. वीज सेवकाची पात्रता त्या गावातील उमेदवाराची नसेल तर ५ किलोमिटरच्या परिसरातील जाहिरात देऊन वीज सेवकाची नेमणूक करावी, अशी अट सुद्धा शासकीय परिपत्रकात नमूद आहे. परंतु पंचायत समिती चांदूररेल्वेच्या प्रशासनाने ग्रामपंचायतीने निवड केलेल्या उमेदवारांची शहानिशा न करता जशीच्या तशी यादी जि.प.ला मंजुरीसाठी दाखल केली आहे.
४९ ग्रामपंचायतींपैकी तीन हजारांचेवर लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत जळका (जगताप), आमला, घुईखेड, पळसखेड, मालखेड गावाचा समावेश आहे. तीन हजाराचेवर लोकसंख्या असल्याने विद्युत सेवक शासकीय आदेशाने नेमण्यात येणार नाही.
अशा आहेत विद्युत सेवकांच्या जबाबदाºया
मीटर रीडिंग घेणे, वीज देयके वाटप करणे, ब्रेकडाऊन अटेंड करून पूर्ववत वीज पुरवठा सुरू करणे, डी.ओ. फ्यूज टाकणे, फ्यूज कॉल अटेंड करणे, रस्त्यावरील दिवाबत्ती देखभाल व बंद पडलेले दिवे बदलणे, नवीन जोडणीची कामे करणे व थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करणे या जबाबदाºया विद्युत सेवकांना पार पाडावयाच्या आहेत.
नियंत्रण ठेवणार कोण ?
विद्युत सेवकावर महावितरणचे कनिष्ठ अभियंता यांचे तांत्रिक नियंत्रण व ग्रामपंचायतीचे प्रशासकीय नियंत्रण राहील व त्याचे मानधन प्रतिग्राहक ९ रुपये याप्रमाणे असेल. प्राप्त होणारे उत्पन्न किंवा तीन हजार रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम महावितरण कंपनीमार्फत देण्यात येईल. विद्युत कामाच्या जोखमीसाठी त्याचे विमा संरक्षणासाठी महावितरण कंपनीद्वारा योग्य अशी योजना तयार करण्यात येणार आहे.

विद्युत सेवक अपात्र उमेदवारांची यादी चांदूररेल्वेच्या प्रभारी खंडविकास अधिकारी यांना दाखविण्यात आली आहे. ती यादी आम्ही पाठविली असून अपात्र निवड केलेल्या ग्रामपंचायतींना नोटीस देऊन ती नावे कमी करण्यासाठी लेखी पत्र पाठविण्यात येणार आहे.
- सोनाली माडकर,
प्रभारी खंडविकास अधिकारी
पंचायत समिती, चांदूररेल्वे
 

Web Title: Recommendations by ineligible candidates from BDO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.