शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

रवि राणा यांना अचानक ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 5:00 AM

आमदार रवि राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि धान्य वाटण्यासाठी सातत्याने दौरे केले. हा उपक्रम सुरू असतानाच गुरुवारी रात्री २ वाजता त्यांना ताप आला. १०३, १०४ या श्रेणीत ताप होता. त्यांना शरीरभर असह्य वेदना सुरू झाल्या. शिव्हरिंग होते.

ठळक मुद्देक्वारंटाईन : आमदार, खासदार पती-पत्नीचे आज घेणार ‘थ्रोट स्वॅब’

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांना गुरुवारी मध्यरात्रीनंतर अचानक ताप आला. गुरुवारी रात्रभर आणि शुक्रवारी दिवसभर ताप उतरला नसल्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय चिंतेत पडले आहेत. आमदार राणा यांच्यावर आनंद काकाणी हे अमरावतीतच उपचार करीत आहेत.आमदार रवि राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि धान्य वाटण्यासाठी सातत्याने दौरे केले. हा उपक्रम सुरू असतानाच गुरुवारी रात्री २ वाजता त्यांना ताप आला. १०३, १०४ या श्रेणीत ताप होता. त्यांना शरीरभर असह्य वेदना सुरू झाल्या. शिव्हरिंग होते. त्यांच्या अंगावर तब्बल दहा ब्लँकेट टाकल्यावर ते काहीसे स्थिर झाले. नवनीत राणा यांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना याबाबतची माहिती दिली. डॉक्टर आनंद काकाणी यांना आमदार राणा यांच्या निवासस्थानी पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणी करून डॉक्टर काकाणी यांनी आमदार रवि राणा यांच्यावर औषधोपचार सुरू केला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत आमदार राणा यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. औषधांना प्रतिसाद न मिळाल्यास त्यांना रुग्णालयात हलवावे लागेल, असा निर्णय डॉक्टरांनी घेतला. वृत्त लिहिस्तोवर आमदार राणा यांचा ताप कमी झालेला नव्हता. त्यांना अंगभर असलेल्या वेदनाही कायम होत्या. त्यामुळे रात्री त्यांना रुग्णालयात हलविले जाईल, अशी माहिती नवनीत राणा यांनी ‘लोकमत’ला दिली.आमदार राणा क्वारंटाईनवृत्त लिहिस्तोवर आमदार राणा यांना त्यांच्या राहत्या घरी वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले आहे. अर्थात त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कुणालाही त्यांना भेटण्याची परवानगी नाही. शुक्रवारी दुपारी आमदार राणा यांची त्यांच्या निवासस्थानी दोनदा तपासणी करण्यात आली. ज्वर आणि अंगदुखी ही लक्षणे कायम होती.मुंबईच्या डॉक्टरांचाही सल्लापतीच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे चिंताग्रस्त झालेल्या खासदार नवनीत यांनी गुरुवारच्या रात्रीच मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. कोरानाची लक्षणे त्यांनी विचारली. आमदार राणा यांना खोकला नाही; परंतु मुंबईत संबंधित डॉक्टरांनी इलाज केलेल्या काही रुग्णांना खोकला नव्हता. तरीसुद्धा ते कोविड-१९ पॉझिटिव्ह होते, अशी माहिती त्या डॉक्टरांनी दिली. कायम सावध असण्याचा आणि आवश्यक त्या सर्व चाचण्या करवून घेण्याचा सल्ला दिला. शुक्रवारी आमदार राणा यांच्या रक्त चाचण्या करून झाल्यात. त्यात चिंताजनक काही आढळले नाही. परंतु, ताप उतरत नसल्याने, वेदना असह्य असल्याने कुटुंबीय काळजीत आहेत. सदर वृत्त कार्यकर्त्यांमध्ये पसरताच त्यांच्या निवासस्थानी भेट घेणारे येणकेण प्रकारे पोहोचू लागले. त्यांना समजवून परत पाठविण्यात आले.कोरोनासाठीची तपासणी आजशनिवारी सकाळी आमदारांच्या घशातील स्रावाचा नमुना घेतला जाणार आहे. खासदार नवनीत यांचाही थ्रोट स्वॅब घेण्याचे वैद्यकीय सूत्रांनी ठरविले आहे. या नमुन्यांचे अहवाल चिंताजनक आले, तर संपूर्ण कुटुंबाचे नमुने तपासणीला पाठविले जातील.चिमुकल्याला नेले दुसऱ्या कक्षातआमदार राणा यांना गुरुवारी त्रास जाणवायला लागल्यावर त्यांच्या पत्नीने तातडीने सूत्रे हलविली. खबरदारीचा उपाय म्हणून आमदार राणा यांच्या कुशीत निजलेल्या त्यांच्या लहानग्या रणवीर नामक मुलाला दुसºया कक्षात नेले.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाHealthआरोग्य