शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील केशरी कार्डधारक १९ लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 14:31 IST

सलग दुष्काळ अन् नापिकीचा सामना करणाऱ्या १३ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडू नये, यासाठी राज्य शासनाच्या पुरवठा विभागाच्यावतीने एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रतिव्यक्ती पाच किलो धान्यशेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी योजना

गजानन मोहोड।आॅनलाईन लोकमतअमरावती : सलग दुष्काळ अन् नापिकीचा सामना करणाऱ्या १३ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडू नये, यासाठी राज्य शासनाच्या पुरवठा विभागाच्यावतीने एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. वऱ्याडात नोव्हेंबर महिन्यात १९ लाख ३९ हजार ५५५ शेतकऱ्यांना ९ हजार ५५४ मेट्रिक टन धान्य वितरणाचे लक्ष्य होते.अमरावती, औरंगाबाद विभागासह नागपूर जिल्ह्यातील वर्धा अशा शेतकरी आत्महत्याप्रवण १३ जिल्ह्यांसाठी ही योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेच्या निकषानुसार शेतकऱ्यांना दोन रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ असा प्रतिव्यक्ती ५ किलो धान्याचा पुरवठा होत आहे. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये जे लाभार्थी राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम २०१३ च्या अंतर्गत अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नाहीत, अशाच शेतकऱ्यांना प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींच्या परिमाणात लाभ दिला जात आहे. अमरावती विभागात नोव्हेंबर महिन्यात १९ लाख ३९ लाख शेतकऱ्यांसाठी ६ हजार ६०६ मेट्रिक टन गहू, २ हजार ९४८ मेट्रिक टन तांदूळ असे एकूण ९ हजार ५५४ मेट्रिक टन धान्याचे नियतन मंजूर करण्यात आले. ९ हजार ३९९ मेट्रिक टन धान्य उचल करण्यात येऊन ७ हजार ७३ मेट्रिक टन धान्याचे वितरण करण्यात आले. वाटपाची ही ७४ टक्केवारी आहे.अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक सहा लाख लाभार्थीविभागात या योजनेसाठी १९ लाख ३९ हजार लाभार्थींपैकी सर्वाधिक ६ लाख ३ हजार ३३२ अमरावती जिल्ह्यातील आहेत. येथे नोव्हेंबर महिन्यात २२२७ मेट्रिक टन धान्यवाटप करण्यात आले. अकोला जिल्ह्यात २ लाख ५२ हजार ९३० लाभार्थींना ६७१ मेट्रिक टन, वाशिम जिल्ह्यात २ लाख ४६ हजार ९५७ लाभार्थींना ११४६ मेट्रिक टन, बुलडाणा जिल्ह्यात ४ लाख ३१ हजार १२१ लाभार्थींना ९७५ मेट्रिक टन व यवतमाळ जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार २१५ लाभार्थींना २००४ मेट्रिक टन रेशन धान्याचे सवलतीच्या दरात वाटप करण्यात आले.विभागातील १९ लाख ३९ हजार लाभार्थींना सवलतीच्या दरात रेशन धान्याचे वाटप करण्यात येते. नोव्हेंबर महिन्यात ९ हजार ५५४ मेट्रिक टन धान्याचे आवंटन मंजूर होते. पैकी ७ हजार ७३ मेट्रिक टन धान्याचे वाटप करण्यात आले.- रमेश मावस्करउपायुक्त (पुरवठा)

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार