शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

दुप्पटीकरणाचा दर धोक्याच्या वळणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 5:00 AM

कोरोनाची लाट असलेल्या सप्टेंबर महिन्यात रुग्णदुपटीचा कालावधी चक्क १५ दिवसांवर आलेला होता. जिल्ह्यात त्यावेळी कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजारांच्या दरम्यान होती.  आता ३२ हजारांवर पोहोचली आहे. रुग्णसंख्या जसजशी वाढायला लागते, तसतसा रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीला वेळ लागतो. मात्र, जिल्ह्यात ज्या पद्धतीने रुग्णसंख्येचा स्फोट फेब्रुवारी महिन्यात झालेला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या उद्रेकाने २४ फेब्रुवारीला २६६, तर २५ ला १०५ दिवसांवर कालावधी

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट झाल्याने रुग्णदुपटीचा कालावधी धोक्याच्या वळणावर आलेला आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २४ फेब्रुवारीला २६६ दिवसांवर असणारा ‘डबलिंगचा रेट’ २५ फेब्रुवारीला १६१ दिवसांनी कमी होऊन तो १०५ दिवसांवर आलेला आहे. अलीकडे रुग्णसंख्या वाढल्याने ९७ वर असणारा रिकव्हरी रेटदेखील माघारला आहे. सद्य:स्थितीत कोरोनामुक्तीचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८५ टक्क्यांवर आल्याचे वास्तव आहे.कोरोनाची लाट असलेल्या सप्टेंबर महिन्यात रुग्णदुपटीचा कालावधी चक्क १५ दिवसांवर आलेला होता. जिल्ह्यात त्यावेळी कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजारांच्या दरम्यान होती.  आता ३२ हजारांवर पोहोचली आहे. रुग्णसंख्या जसजशी वाढायला लागते, तसतसा रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीला वेळ लागतो. मात्र, जिल्ह्यात ज्या पद्धतीने रुग्णसंख्येचा स्फोट फेब्रुवारी महिन्यात झालेला आहे. त्यानुसार, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी झपाट्याने कमी होऊ लागला आहे. एका दिवसात तब्बल १६१ दिवसांनी कमी होणे म्हणजेच जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचे द्योतक आहे.जिल्ह्यात एप्रिलमध्ये पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली होती. त्यानंतरच्या ३२६ दिवसांत म्हणजेच २४ फेब्रुवारीला कोरोनाग्रस्तांची संख्या ३१,९२५ वर पोहोचली आहे. म्हणजेच, दरदिवशी सरासरी ९७.२२ कोरोनाग्रस्तांची नोंद या काळात झालेली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आलेख नोव्हेंबर व डिसेंबर महिने वगळता चढताच राहिला आहे. १६ मे रोजी म्हणजेच पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाल्याच्या ४२ दिवसांत १०१ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झाली. त्यानंतर, १३ दिवसांत म्हणजेच २९ मे रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या २०२ झाली. त्यानंतर, १९ जूनला ४०६ व ११ जुलैला ८२१० वर पोहोचली. २४ जुलै रोजी १६०८ वर कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली आहे. हा कालावधी केवळ १३ दिवसांचा होता. ११ ऑगस्ट रोजी ३२०९, ४ सप्टेंबर रोजी ६४०९ व २५ सप्टेंबर रोजी १२,२३३ पोहोचली होती. मात्र, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत संक्रमण कमी आल्याने ‘डबलिंग रेट’ माघारला व ३०० वर गेला होता. आता १ फेब्रुवारीनंतर पुन्हा कोरोनाचा धमाका सुरू झाल्याने हा कालावधी झपाट्याने कमी होऊ लागल्याची धोक्याची घंटा आहे.

कोरोनाचा उद्रेक, रिकव्हरी रेट माघारलानोव्हेंबर २०२० पासून जिल्ह्यात संक्रमणमुक्त रुग्णांचे प्रमाण राज्यात अव्वल ९६ ते ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. मात्र, जानेवारीनंतर रुग्णसंख्या वाढायला लागली व फेब्रुवारी महिन्यात रोज कोरोनाचा उद्रेक होत असल्याने ‘रिकव्हरी रेट’ म्हणजेच एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८५.३८ टक्क्यांवर पोहोचले असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.

‘डबलिंग रेट’ नियोजनासाठी महत्त्वाचाकोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा प्रशासनासाठी फार महत्त्वाचा असतो. यासंदर्भात सातत्याने आढावा घेतला जाऊन नियोजन ठरविले जाते. कोरोना संसर्गामुळे किती दिवसांत किती रुग्ण वाढले, याचा अंदाज प्रशासनाला येऊन आवश्यक त्या उपाययोजना व सुविधांची निर्मिती केली जाते.  हॉस्पिटल, बेडसंख्या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधी यांचे नियोजन केले जाते.

रुग्णसंख्येत वाढ, मृत्युदरात कमीफेब्रुवारीच्या २५ दिवसांत १०,८५२ रुग्णांत वाढ झालेली आहे. त्यामुळे आता मृत्युदरात कमी आलेली आहे. जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये आठ टक्क्यांवर असणारा मृत्युदर नंतर कमी होत दोन टक्क्यांवर स्थिरावला होता. मध्यंतरी, काही पाॅइंटने वाढ झालेली होती. आता फेब्रुवारीच्या २४ दिवसांत ६३ रुग्णांची नोंद झाली असली, तरी रुग्णसंख्या वाढल्याने मृत्युदर १.५१ टक्क्यांवर आलेला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या