शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन १ डिसेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 7:21 PM

ईश्वराने निर्माण केलेल्या या विश्वात संत परंपरेने साहित्य निर्मिती करून सामान्य जणांना प्रबुद्ध केले.

- अमित कांडलकर

गुरुकुंज-मोझरी (अमरावती) : अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ व भारतीय विचारमंच, विदर्भ प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे विदर्भस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन १ डिसेंबरला आयोजित करण्यात आले आहे.

ईश्वराने निर्माण केलेल्या या विश्वात संत परंपरेने साहित्य निर्मिती करून सामान्य जणांना प्रबुद्ध केले. त्याच संत परंपरेतील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अतुल्य साहित्य निर्मितीतून प्रगटलेल्या विचारांना उजाळा देण्यासाठी व त्यांच्या समग्र साहित्यावर विचारमंथन करण्यासाठी सातवे विदर्भस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ८ वाजता गुरुकुंज आश्रमातून ग्रंथदिंडी काढण्यात येईल. सकाळी १०.३० वाजता उद्घाटन समारोह होईल. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजाचे प्राचार्य गजानन जाधव, उद्घाटक म्हणून राजेश जयपूरकर, प्रमुख अतिथी म्हणून सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, सरचिटणीस जनार्दनपंत बोथे हे उपस्थित राहतील. सूत्रसंचालन दिलीप कोहळे करतील.

दुपारच्या सत्रात परिसंवाद कार्यक्रमात राष्ट्रसंतांच्या साहित्यातील सांस्कृतिक राष्ट्रदर्शन या विषयावर सूर्यप्रकाश जयस्वाल हे मत व्यक्त करतील. यावेळी अध्यक्षस्थानी अरविंदराव देशमुख हे राहतील. सबका हो विश्वास प्रभू पर, अपनी शक्ती बढाने या विषयावर नागपूरच्या शलाका जोशी या विचार व्यक्त करतील. ग्रामगीतेतील मातृशक्ती आणि राष्ट्रनिर्माण या विषयावर कोमल ठाकरे या मत व्यक्त करतील. दरम्यान राष्ट्रसंतांच्या काव्यातील देशभक्ती या विषयावर सुधीर रायपूरकर हे आपले विचार व्यक्त करतील.

दुपारी ३ ते ४ वाजता अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी यांच्यासोबत 'एक संवाद आधारवडाशी' या विषयावर संवादक राजेंद्र नाईकवाडे व ज्ञानेश्वर गहूकर हे असतील. दुपारी ४ ते ५ वाजता या कार्यक्रमाचा समारोप होईल. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्ञानेश्वर महाराज वाघ राहतील. सूत्रसंचालन अरुण मेश्राम करतील. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता होईल, अशी माहिती सुभाष लोहे, विदर्भ प्रांत संयोजक भारतीय विचारमंच यांनी पत्रपरिषदेतून दिली. यावेळी संयोजक राजाराम बोथे,  अरुण मेश्राम, अरविंद राठोड, अमोल बांबल उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती