२ जूनपर्यंत विदर्भात मान्सूनपूर्व वादळी पाऊस

By Admin | Updated: May 30, 2015 00:38 IST2015-05-30T00:38:57+5:302015-05-30T00:38:57+5:30

मान्सूनच्या वाऱ्यांनी अर्धी श्रीलंका व्यापली असून ३० मेपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्यास अनुकूल परिस्थिती

Rainfall before monsoon in Vidharbha till June 2 | २ जूनपर्यंत विदर्भात मान्सूनपूर्व वादळी पाऊस

२ जूनपर्यंत विदर्भात मान्सूनपूर्व वादळी पाऊस

हवामान तज्ज्ञांचा अंदाज : उष्णतेची लाटही राहणार
अमरावती : मान्सूनच्या वाऱ्यांनी अर्धी श्रीलंका व्यापली असून ३० मेपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्यास अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे २ जूनपर्यंत विदर्भातील काही ठिकाणी मान्सूनपूर्व वादळी पाऊस व तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानवर पश्चिमी विक्षेप चक्राकार वाऱ्याच्या स्वरुपात तीन किलोमिटरच्या उंचीवर सक्रिय आहेत. मध्यराजस्थानच्या दीड किलोमीटर उंचीवरही चक्राकार वारे वाहात आहेत. केरळमध्ये पूर्व-पश्चिम ही खंडित वाऱ्याची दिशा आहे. पूर्व बिहार आणि लगतच्या हिमालयीन पश्मिच बंगालच्या दीड किलोमिटर उंचीवरही चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे २ जूनपर्यंत विदर्भातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर अन्य ठिकाणच्या कमाल तापमानात २ डिग्री सेल्सीअसने घट होण्याची शक्यता आहे. परिणामी २ जूनपर्यंत विदर्भातील काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह मान्सुनपूर्व वादळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे कडाक्याच्या उकाड्यापासून दिलासा मिळेल.

अमरावतीत मेघगर्जनेसह वादळी पाऊस
जिल्ह्यातील विविध ठिकाणी शुक्रवारी मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची ताराबंळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्णतामानाने नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत होती. मात्र, गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या पावसामुळे नागरिकांना उन्हापासून थोडा दिलासा मिळाला आहे. आता पुढील काही दिवस ऊन व पावसाचा खेळ सुरु राहणार असून नागरिक मान्सूनची प्रतीक्षा करीत आहेत.

Web Title: Rainfall before monsoon in Vidharbha till June 2