शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा प्रकल्पाची उदासीनता जिवावर बेतली

By admin | Updated: February 28, 2015 00:40 IST

मागील दोन वर्षांपासून कालव्याचे पाणी शेतात साचत असल्यामुळे अर्ध्याअधिक शेतातील पिकांचे नुकसान झाले. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही

सुरेश सवळे चांदूरबाजारमागील दोन वर्षांपासून कालव्याचे पाणी शेतात साचत असल्यामुळे अर्ध्याअधिक शेतातील पिकांचे नुकसान झाले. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही पूर्णा मध्यम प्रकल्प उपविभाग क्रमांक ४ च्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी कुटुंबातील मुलाने आत्महत्या केली. या आत्महत्येला प्रकल्प उपविभागातील अधिकारी व कर्मचारी जबाबदार असून त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार मृताच्या भावाने पोलिसात केली आहे. नानोरी येथील शेतकरी विठ्ठलराव धर्माळे यांचे बोरज शिवारात गट नंबर ७२/१ मध्ये ६८ आर शेत आहे. या जिरायती शेतातील उत्पन्नाच्या भरवशावर विठ्ठलराव त्यांच्या कुटुंबाची उपजिविका भागविते. शेताच्या मध्यभागातून विश्रोळी येथे पूर्णा प्रकल्पाचे रेल क्रमांक १२ च्या कालव्याची मुख्य १२ इंच व्यासाची पाईपलाईन गेली आहे. ही पाईप लाईन दोन वर्षांपासून फुटल्यामुळे संपूर्ण शेतात पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. त्यामुळे अर्ध्याअधिक शेतात पाणी साचले आहे. या बाबीची तक्रार दोन वर्षांपासून धर्माळे कुटुंब पूर्णा मध्यम प्रकल्प उपविभाग क्रमांक ४ च्या अधिकाऱ्यांकडे करीत आहे. शेतात पाणी साचण्याचे प्रमाण वाढल्यामुळे दोन वर्षांपासून अर्ध्याअधिक शेतातील पिकांचे नुकसान होत असून पेरलेले पिकही हाती लागत नाही. ही बाबसुद्धा तक्रारीच्या माध्यमातून पूर्णा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.सध्या शेतात हरभऱ्याचे पीक आहे. या साचलेल्या पाण्यामुळे हरभऱ्याचे पीक सडत असल्याचे पाहून २५ फेब्रुवारी रोजी आशिष धर्माळे हा संबंधित अधिकाऱ्याकडे गेला व लिकेज पाईप लाईन जोडण्याची विनंती केली. परंतु तेथील उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आशिषला शिवीगाळ करून हाकलून लावल्याचे त्याने आईला सांगितले. इतकेच नव्हे तर आशिषने विषारी औषध प्राशन केले ही बाब आईच्या लक्षात आल्यावर शेजारी नागरिकांच्या मदतीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आशिषच्या आत्महत्येला जलसंपदा विभागाच्या पूर्णा प्रकल्प उपविभाग क्र. ४ चांदूरबाजार येथील अधिकारी व कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप मृताचा भाऊ भूजंग धर्माळे यांनी केला आहे. पोलिसात व तहसीलदाराकडे या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहे.