शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी बंद, आमदार संतापले

By admin | Updated: April 11, 2017 00:21 IST

जिल्ह्यातील नाफेडचे शासकीय तूर खरेदी केंद्र अचानक बंद केल्याने महिनाभरापासून शेतकऱ्यांचा माल मोजणीच्या प्रतीक्षेत पडून आहे.

प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती : वीरेंद्र जगताप, बच्चू कडू आक्रमकअमरावती : जिल्ह्यातील नाफेडचे शासकीय तूर खरेदी केंद्र अचानक बंद केल्याने महिनाभरापासून शेतकऱ्यांचा माल मोजणीच्या प्रतीक्षेत पडून आहे. शेतकऱ्यांचे हाल होत असताना प्रशासन मात्र बारदाना, गोदाम नसल्याची कारणे सांगून वेळ मारून नेत असल्याने सोमवारी आ.वीरेंद्र जगताप, आ. बच्चू कडू यांनी आक्रमक होत प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला.चांदूररेल्वे, धामणगांव रेल्वे व अचलपूर येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डवर हजारो क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत पडून आहे. शेतकरी सर्व कामे सोडून शासकीय तूर खरेदी केंद्रांवर दररोज चकरा मारत आहेत.मात्र, प्रशासनाला शेतकऱ्यांच्या समस्येविषयी अजिबात गांभीर्य नाही. मागील आठवडयात आ. वीरेंद्र जगताप यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली होती. त्यावर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शुक्रवारपासून तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सोमवार उजाडला तरी तूर खरेदी सुरू न झाल्याने आ. जगताप व बच्चू कडू यांनी जिल्हाकचेरीवर धडक देऊन अपर जिल्हाधिकारी के.आर.परदेशी यांना जाब विचारला.ंतातडीने तूर खरेदी करण्याचे निर्देशअमरावती : यावेळी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधला असता पुन्हा बारदाना नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. मात्र, उभय आमदारांचा आक्रमक पावित्रा पाहता अपर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने तूर खरेदी करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. यावेळी चांदूररेल्वे व धामणगाव रेल्वे बाजार समिती पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, पणन्चे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अशोक देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे आदींचीही उपस्थिती होती. (प्रतिनिधी)बारदाना देण्यास तयारचांदूररेल्वे व धामणगांव रेल्वे बाजार समितीमधील शासकीय तूर खरेदी केंद्रात बारदानाअभावी तूर खरेदी बंद राहात असेल तर या दोन्ही केंद्रांवर बाजार समितीव्दारे बारदाना उपलब्ध करून देण्याची ग्वाही दोन्ही बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. मात्र, नाफेडव्दारा याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. बारदाना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दोन्ही बाजार समितींद्वारे दिल्यानंतर येथील तूर खरेदी सुरळीत होऊ शकते. हा तर शासनाचाच डावबारदाना नसल्याचे कारण सांगत शासकीय तूर खरेदी बंद ठेवली जात असेल तर हा शासनाचा डाव आहे. शासनाचे शेतकरीविरोधी धोरण यामधून दिसून येते. शेतकऱ्यांना शासनच न्याय देत नसेल तर अपेक्षा कुणाकडून करायची, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.