शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘पुंडलिक वरदे.. हरी..विठ्ठल’चा गजर !

By admin | Updated: November 16, 2016 00:15 IST

पुंडलिक वर दे..हरी विठठल..श्री ज्ञानदेव तुकाराम.., जय हरी विठ्ठल...च्या नामगजराने मंगळवारी विदर्भाची पंढरी कौंडण्यपूर नगरी दुमदुुमली. ...

कौंडण्यपुरात दहीहंडी : रूख्माई-वल्लभाच्या दर्शनाचा अद्वितीय सोहळा तिवसा : पुंडलिक वर दे..हरी विठठल..श्री ज्ञानदेव तुकाराम.., जय हरी विठ्ठल...च्या नामगजराने मंगळवारी विदर्भाची पंढरी कौंडण्यपूर नगरी दुमदुुमली. रूख्माई-वल्लभाच्या दर्शनाच्या अनिवार ओढीने येथे आलेल्या हजारोे भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. मंगळवारी कौंडण्यपूरात प्रती पंढरपूर अवतरल्याचा भास होत होता. कमला रूख्मिणी पिठाचे पिठाधीश जगदगुरू राजेश्वर माऊली यांनी दहीहंडी फोडली. प्राचीन विदर्भाची राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर नगरीत कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली. मंगळवारी दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने हजारो भाविकांची गर्दी कौंडण्यपुरात उसळली होती. कौंडण्यपूरात दीड दिवस प्रत्यक्ष पांडुरंग वास करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नव्हे, तसे वचन खुद्द पांडुरंगानेच त्यांचे प्राणप्रीय सदाराम महाराजांना दिले होते. या पवित्र मातीमध्ये पुराणातील पाच महासतींनी जन्म घेतला. येथील मंदिरातून भगवान श्रीकृष्णाने देवी रूख्मिणीचे हरण केले होते. या प्राचीन नगरीला वैभवशाली परंपरा लाभली आहे. यंदा दहीहंडी उत्सवाला अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे मठाधिपती प.पू.जितेंद्रनाथ महाराज, तिवसा मतदार संघाच्या आ. यशोमती ठाकूर, नागपूर येथील सत्संग मंडळाचे अध्यक्ष सुधीर दिवे, संस्थानचे अध्यक्ष हिम्मत टाकोणे, हभप रंगराव महाराज, पंचायत समिती सदस्य उज्ज्वला पांडव, माजी उपसभापती भारत ढोणे आदींची उपस्थिती होती. उपाध्यक्ष वसंत डाहे, सचिव नामदेव उमाळकर, कोषाध्यक्ष अरविंद वेरूळकरदेखील उपस्थित होते.५० पालखींची परिक्रमा मंगळवारी सकाळी कौंडण्यपूरला आलेल्या ५० पालख्यांनी नगरात परिक्रमा केली. यावेळी चौकाचौकात दिंडी व पालखींचे स्वागत करण्यात आले. दुपारी संत अच्युत महाराज संस्थानचे अध्यक्ष सुधीर दिवे व कुटुंबियांच्यावतीने पालख्यांसमवेत आलेल्या भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यातल आले. सायंकाळी ६ वाजता टेकडीवर नेत्रदीपक दहीहंडी सोहळा पार पडला.