शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे

By admin | Updated: July 4, 2016 00:07 IST

देशातील ९८ शहरांची स्मार्ट सिटीसाठी मागील वर्षी निवड झाली, त्यामध्ये अमरावतीचा सहभाग आहे. केंद्र शासन ....

२,२६८ कोटींचा प्रस्ताव : विविध बाबींचा समावेशअमरावती : देशातील ९८ शहरांची स्मार्ट सिटीसाठी मागील वर्षी निवड झाली, त्यामध्ये अमरावतीचा सहभाग आहे. केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील संभाव्य प्रवेशासाठी अमरावती महानगरपालिकेने फेर प्रस्ताव बनविला. हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.सदर प्रस्तावात पहिल्या फेरीत ग्रीणफिल्डमध्ये छत्रीतलावजवळ अंदाजे ३५० एकर जागा घेण्यात आली होती. दुसऱ्या फेरीमध्ये केंद्र शासनाकडून आयोजित कार्यशाळेत स्मार्ट सिटी प्रकल्पात सुधारणा सुचविण्यात आल्या. त्यानुसार रेट्रोफिटिंगमध्ये यशोदानगर ते दस्तुरनगरची अंदाजे ७०० एकर जागा झोपडपट्टी पुनर्विकास अंतर्गत २५ एकर जागा तसेच पॅन सिटी इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आलेला होता. त्यानंतर शासनाच्या तज्ज्ञ समितीसोबत झालेल्या कार्यशाळेत चर्चेच्या अनुषंगाने शहराच्या जुना विकास व नवीन विकास याबद्दल चर्चा करण्यात आली. चर्चादरम्यान रेट्रोफिटिंगच्या अंतर्गत मॉडेल टाऊनचा विकास करणे अपेक्षित होते. त्या अनुषंगाने प्रस्तावात फेरबदल सुचविण्यात आले. त्या प्रमाणे शहरातील मागच्या २० वर्षामध्ये विकसित झालेला ३३६ एकर जागा यशोदानगर ते दस्तुरनगर व शहरातील ५० वर्षांमध्ये विकसित झालेला ३१९ एकर जागा रेल्वे लाईन ते शिवटेकडी (मालटेकडी) मधील व अमरावती बसस्थानक रोड ते दक्षिणेकडील अंबा नाला यामधील परिसर समाविष्ट करण्यात आला. प्रायोगिक तत्त्वावर शहराचा स्मार्ट सिटी विकास मॉडेल बनवताना जुन्या शहराचा स्मार्ट सिटी मॉडेल व नव्याने विकसित झालेल्या क्षेत्राचा स्मार्ट सिटी मॉडेल अशा प्रकारच्या दोन संकल्पना सादर करण्यात आल्या. झोपडपट्टी पुनर्विकास अंतर्गत २५ एकर जागा तशी ठेवण्यात आली. या प्रकल्पात पॅन सिटी अंतर्गत संपूर्ण शहराचा विकास स्मार्ट सोल्युशन व नवीन तंत्रज्ञान यांचा वापर करून होणे अपेक्षित आहे. पॅन सिटी अंतर्गत २४ तास पाणीपुरवठा व विद्युत पुरवठा, ट्रान्सपोर्ट व मोबिलिटी, सिसिटिव्ही सुपरव्हिजन, कमांड अ‍ॅन्ड कन्ट्रोल सेंटर अशा अनेक अत्याधुनिक सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवून अमरावती शहराचा विकास करण्यात येणार आहे. सदर प्रस्तावाचे सादरीकरण ३० जून रोजी विशेष उच्चाधिकार समिती, मंत्रालय, मुंबई यांच्यासमोर करण्यात आले व सदर समितीने मान्यता दिल्यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नगरविकास विभागाकडे ३० जून रोजी सादर करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)