अहमदाबादवरून नागपूरला जाणारी २८ लाखांची प्रतिबंधित एचटीबीटी पाकिटे केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:36 IST2025-06-02T12:35:23+5:302025-06-02T12:36:19+5:30

Amravati : 'गुजरात ट्रॅव्हल्स'द्वारे खेप

Prohibited HTBT packets worth Rs 28 lakhs from Ahmedabad to Nagpur seized | अहमदाबादवरून नागपूरला जाणारी २८ लाखांची प्रतिबंधित एचटीबीटी पाकिटे केली जप्त

Prohibited HTBT packets worth Rs 28 lakhs from Ahmedabad to Nagpur seized

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
ॲग्रो सीइस हिंमतनगर (गुजरात) येथून नागपूरला ट्रॅव्हल्सद्वारे जाणारी एचटीबीटीची २५०० पाकिटे व ६२०० रिकामे पाकिटे शहरातील वेलकम पॉइंटवर कृषी विभागाच्या विभागीय पथकाने रविवारी सकाळी पकडली. किमान २८ लाखांचे हे बियाणे व जप्त पाकिटे असल्याचे पथकाने सांगितले.


अहमदाबादवरून नागपूरकडे जाणाऱ्या गुजरात ट्रॅव्हल्सची पथकाने तपासणी केली असता, डिकीत ५० कट्ट्यात प्रतिबंधित एचटीबीटीची २५०० व रिकामे ६४०० पाकिटे चार कट्टयांत आढळल्याने पथकाने जप्त केली. जप्त २५०० पाकिटांवर वीडगार्ड बीजीएम व रेडीकॉट ५ जी शिवाय चार कट्ट्यांमधील ३२०० रिकामे पाकिटांवर रेडीकॉट ५ व ३२०० पाकिटांवर तिलक रिसर्च कॉटन सिड्स असे नाव आहे. याप्रकरणी तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) राजेश जानकर यांनी येथील गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. 


जप्त करण्यात आलेली २५०० पाकिटे ही ॲग्रोसीइस हिंमतनगर, अहमदाबाद (गुजरात) येथून ट्रॅव्हल्सद्वारे अमितभाई, भुरे कॉम्प्लेक्स, भारत पेट्रोलियमसमोर, नागपूर व रिकामे ६४०० पाकिटे राजू भरमासे, नागपूर यांना पाठविण्यात येत होती. चालकाजवळ असलेल्या बिल्टीमध्ये हा उल्लेख पथकाला आढळला. या दोघांसह ॲग्रोसीड व साई क्रियेशन (दोन्ही अहमदाबाद, गुजरात) यांच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Prohibited HTBT packets worth Rs 28 lakhs from Ahmedabad to Nagpur seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.