प्राध्यापकाचा आत्मघात; नोट मिळाली, सस्पेन्स कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 10:35 IST2023-03-21T10:33:38+5:302023-03-21T10:35:26+5:30

रविवारी रात्री ९ च्या सुमारास घटना उघड झाली

Professor commits Suicide in Amravati; found suicide note but suspense continues | प्राध्यापकाचा आत्मघात; नोट मिळाली, सस्पेन्स कायम!

प्राध्यापकाचा आत्मघात; नोट मिळाली, सस्पेन्स कायम!

अमरावती : न्यू राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. डॉ. मनीष मोतीसिंह बैस (५२) यांच्या आत्महत्येचे गूढ अद्यापही उलगडलेले नाही. याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी रविवारी उशिरा रात्री आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. घटनास्थळाहून सुसाइड नोट जप्त केली. कॅम्प भागातील वृंदावन कॉलनी येथील घरात बैस यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता.

रविवारी रात्री ९ च्या सुमारास ती घटना उघड झाली. वडील फोन रिसिव्ह करीत नसल्याने बैस यांच्या मुंबईला उच्चशिक्षण घेत असलेल्या मुलाने त्याच्या एका स्थानिक मित्राला वृंदावन कॉलनीतील घरी पाठविले होते. दरम्यान सुसाइड नोटच्या पहिल्या पानावरील मजकूर हा मुलाच्या नावे आहे. दुसऱ्या पानावरील मजकूर कॉलेजमधील बैस यांच्या एका ज्येष्ठ सहकाऱ्याच्या नावे आहे. त्यात मानसिक त्रास सहनशक्तीपलीकडे गेल्याचे नमूद केले आहे.

Web Title: Professor commits Suicide in Amravati; found suicide note but suspense continues