मध्य रेल्वेचे ओव्हर ब्रीज, अंडरपाथ रस्ते निर्मितीला प्राधान्य; लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढण्याची माेहीम सुरू

By गणेश वासनिक | Updated: July 16, 2023 14:27 IST2023-07-16T14:27:23+5:302023-07-16T14:27:47+5:30

मध्य रेल्वे मुंबई विभागात पायाभूत सुविधांमुळे ‘शून्य’ अपघात

Priority for construction of over bridges, underpath roads of Central Railway; The process of removing the level crossing gates is underway | मध्य रेल्वेचे ओव्हर ब्रीज, अंडरपाथ रस्ते निर्मितीला प्राधान्य; लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढण्याची माेहीम सुरू

मध्य रेल्वेचे ओव्हर ब्रीज, अंडरपाथ रस्ते निर्मितीला प्राधान्य; लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढण्याची माेहीम सुरू

अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागातंर्गत लेव्हल लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढून टाकण्याची माेहीम युद्धस्तरावर हाती घेतली आहे. आता रस्ते उड्डाणपूल, भुयारी मार्गाच्या पूल निर्मितीला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे या पायाभूत सुविधांमुळे गेल्या जून महिन्यात रेल्वे शून्य अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने जून २०२३ मध्ये सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक कामे हाताळली आहे. यात लेव्हल क्रॉसिंग (एलसी) गेट्स बंद करण्यात येत असल्याने अधिक चांगली वक्तशीरता राखण्यात मदत होते आणि सुरक्षितता वाढते. मध्य रेल्वेने पाच लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करून त्याजागी ओव्हर ब्रीज बांधले आहे. तर एप्रिल ते जून २०२३ या दरम्यान १२ ओव्हर ब्रीज निर्माण करून ते वाहतुकीसाठी सज्ज करण्यात आले आहे. पुणे विभागातील पुणे-दौंड रेल्वे मार्ग आणि नागपूर विभागातील इटारसी-आमला

रेल्वे मार्गावर लेव्हल क्रॉसिंग फाटकांच्या जागी पुलाखाली रस्ता तयार करण्यात आला आहे. नागपूर-वर्धा विभागात लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांंक १११ व ११६ तर पुणे विभागातील पुणे-मिरज विभाग लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांंक ८१ आणि ९२ च्या जागी ओव्हर ब्रीज साकारण्यात आला आहे. बडनेरा जुनिवस्ती येथे ओव्हर ब्रीज निर्मितीचे कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. तर अमरावती गाेपालनगर, धामणगाव रेल्वे येथे लेव्हल क्रॉसिंग गेट्सच्या जागी ओव्हर ब्रीज मंजूर झाला असून, सर्वेक्षणाची कामे आटोपली आहेत.

डब्यांमध्ये स्मोक डिटेक्शन आणि सप्रेशन डिवाइस उपकरण
आग रोखण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून डब्यांमध्ये स्मोक डिटेक्शन आणि सप्रेशन डिवाइस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. जानेवारी ते जून या कालावधीत २४ डब्यात ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. १३७ पॉवर कार्सना स्मोक डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम प्रदान करण्यात आले आहे. एलएचबी कोच, आयसीएफ पेंट्री कोचमध्ये ही यंत्रणा लावण्यात आली आहे.

Web Title: Priority for construction of over bridges, underpath roads of Central Railway; The process of removing the level crossing gates is underway