शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी भूसंपादन, पुनर्वसनाला प्राधान्य द्या

By admin | Updated: August 7, 2015 00:29 IST

प्रस्तावित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूसंपादन व पुनर्वसनाला प्राधान्य दिले जावे, तसेच प्रकल्पासाठी तांत्रिक मान्यता देताना विशेष दक्षता घ्यावी.

आढावा बैठक : अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तवअमरावती : प्रस्तावित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूसंपादन व पुनर्वसनाला प्राधान्य दिले जावे, तसेच प्रकल्पासाठी तांत्रिक मान्यता देताना विशेष दक्षता घ्यावी. जेणेकरुन त्या कामात फेरबदल होणार नाहीत, असे निर्देश वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी मंगळवारी आयोजित बैठकीत दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेत अमरावती विभागातील अनुशेषांतर्गत अपूर्ण प्रकल्पाची स्थिती व सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत निश्चित धोरण करण्यासाठी आढावा घेण्यात आला. यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर.बी. शुक्ला, जिल्हाधिकारी किरण गित्ते, यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्र्र प्रतापसिंह, जलसंपदाचे मुख्य अभियंता एच.आर. ढंगारे, पी.एस. घोलप, उपायुक्त ओमप्रकाश अग्रवाल आदी उपस्थित होते. सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी विभागात बरेचशे प्रकल्प प्रस्तावित आहेत. अनेक प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जलसंपदा तसेच भू-संपादन व अन्य विभागांनी आपसात समन्वय ठेवण्याची गरज आहे. प्रकल्प मंजूर झाल्यानंतर काही अडचणींमुळे प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण झाला नाही तर त्याच्या मूळ किमतीत वाढ होते, ही बाब श्रीवास्तव यांनी बैठकीत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तांत्रिक मान्यता देताना भविष्यात येणाऱ्या अडीअडचणींचा विचार सुरुवातीलाच केला जावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्यात. या बैठकीत प्रधान सचिव सतीश गवई, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर.बी. शुक्ला, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीला विभागातील जलसंपदाचे विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, भूसंपादन अधिकारी, बुलडाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी राम सिद्धभट्टी यांनी उपस्थितांचे आभार मानले.