संत्रा मोसंबी कलमाचे भावही वधारले मात्र मागणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:23+5:302021-07-21T04:11:23+5:30

वरुड :- विदर्भाच्या कॅलिफोर्नियामध्ये शेंदुर्जनाघाट येथे संत्रा,, मोसंबी सह लिबूवर्गीय कलमाचे मोठे उत्पादन घेतल्या जाते . दरवर्षी एक ...

Prices of oranges have also gone up but there is no demand | संत्रा मोसंबी कलमाचे भावही वधारले मात्र मागणी नाही

संत्रा मोसंबी कलमाचे भावही वधारले मात्र मागणी नाही

वरुड :- विदर्भाच्या कॅलिफोर्नियामध्ये शेंदुर्जनाघाट येथे संत्रा,, मोसंबी सह लिबूवर्गीय कलमाचे मोठे उत्पादन घेतल्या जाते . दरवर्षी एक कोटीपेक्षा अधिक संत्रा कलमाचे उत्पादन काढल्या जाते . परंतु लॉक डाउनचा फटका आणि मृगाच्या पावसाने एक महिना पाठ फिरविल्याने संत्रा कलमा उत्पादकाला फटका बसला आहे . संत्रा कलम ४० ते ५० रुपयांपर्यंत तर मोसंबी कलमाला ६० ते ७० रुपये भाव मिळत आहे . मात्र मागणी नसल्याने नर्सरीधारकाला उत्पादन खर्ची काढणं कठीण झाले आहे . यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका संत्रा कलम उत्पादकांना बसणार आहे .

विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील शेंदुर्जनघाट येथे गेल्या ७० वर्षपासून संत्रा कलमा निर्मितीचा पारंपारिक व्यवसाय शेतकरी करतात . येथून देशाच्या कानाकोपर्यात संत्रा , मोसंबी कलमा नेऊन संत्रा मोसंबीचे उत्पादन काढल्या जाते . खात्रीशीर संत्रा कलमाचे माहेरघर शेंदूरजनाघाट आहे . वरुड तालुक्यात शेंद्रूजनाघाट सह अधिकृत नर्सरी परवानाधारकांची संख्या २२० आहे . तर तेव्हढेच विनापरवानाधारकांची संख्या आहे.इडिलिंबू पासून काढलेल्या बियापासून नोव्हेंबर जानेवारी मध्ये जंभेरींचे रोप तयार केल्या जाते . त्यावर संत्रा, मोसंबी, लिंबूची कलम (डोळा ) चढविण्याची बडींग प्रक्रिया केल्या जाते . १८ महिने मशागत जपवणूक करून जुळ्यांच्या पहिल्या आठवड्यापासून मध्ये संत्रा, मोसंबी ., लिंबू कलमा विक्री करिता तयार होतात . येथील संत्रा कलमा मध्यप्रदेश , राजस्थान , आंध्र प्रदेश , पश्चिम महाराष्ट्र सह असते .परंतु यावर्षी मृगाने दडी मारल्याने ग्राहक फिरकले नाही तर अधून मधून काही भागात पाऊस पडल्याने गेल्या आठ दिवसापासून संत्रा मोसंबी कलमाच्या बाजारात रेलचेल होती . एक कोटीपेक्षा अधिक संत्रा कलमा विक्रीच्या प्रतीक्षेत असून ग्राहकाची चातकाप्रमाणे वाट बघत आहे . परंतु तब्बल दीड महिना पावसाळा कोरडा गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला . यामुळे परप्रांतीय ग्राहक फिरकलेच नाही तर विदर्भातून ग्राहकांची गर्दी वाढली आहे . संत्रा कलमांना ४० ते ५० रुपये प्रति कलम तर मोसंबीला ६० ते ७० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च सुद्धा काढणे संत्रा कलम उत्पादकांना जड झाले आहे . तिवसा घाटाच्या बाजारात संत्रामोसंबी कलम काढणारे शेतमजूर , पोटे , दोऱ्या विकणारे दुकानदार सुद्धा ग्राहकांच्या प्रतीक्षेत असतात . यामुळे हजारो हातांना रोजगार देणार्या संत्रा कलमांना ग्राहक मिळत नसल्याने रोजगारावरसुद्धा विपरीत परिणाम झाला आहे . संत्रा कालमान मागणी नसल्याने अद्यापही ८० टक्के संत्रा कलमा शेतातच आहे . पाऊस वेळेवर आला नसल्याने परिसरातील नर्सरीधारकांना कोट्यवधींचा फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहे .

* अशी होते संत्रा कलमाची उलाढाल !

संत्रा , मोसंबी कलमा उत्पादीत करण्याकरिता ३० ते ३५ रुपये खर्च येतो , रोपांची किमंत १५ रुपये प्रतिरूप द्यावी लागते तर डोळा चढविणे, मशागतीचा खर्च २० रुपयांपर्यंत होतो . मात्र वेळेवर निसर्गाने साथ दिली आणि समाधानकारक पाऊस पडला तर चांगले भाव मिळतात परंतु यावर्षी पावसाचा फटका बसल्याने परप्रांतिवय ग्राहक आणि शासकीय फलोत्पादन योजनेचे परवाने सुद्धा आलं एनसल्याने खासगीत केवळ ४० ते ५० रुपये भावाने विकावी लागत आहे यामुळे नर्सरीधारकांना कोट्यवधींचा फटका बसणार आहे . तालुक्यातील २२० अधिकृत आणि तेवढेच अनधिकृत नर्सरी धारक असल्याने एक कोटीपेक्षा संत्रा कलमाचे उत्पादन विक्रीच्या प्रतीक्षेत असून संत्र कलमा उत्पादक चिंतातुर झाला आहे .

* पावसाने दडी मारल्यानेच संत्रा कलमाची विक्री थांबली !- उद्धव फुटाणे नर्सरीधारक तिवसाघाट

यावर्षी लॉक डाऊन आणि मृगाच्या पावसाने दडी मारल्याने संत्रा कलमा उत्पादकांना फटका बसला आहे . उत्पादनखर्च काढणे कठीण झालं असून समाधान कारक पाऊस नसल्याने ८० ते ७५ टक्के कलमा विक्रीच्या प्रतीक्षेत आहे .शासनाने नर्सरी उत्पादकां शासकीय संत्रा खरेदीचे परमिट द्यावे तसेच नर्सरीधारकांना विमासंरक्षण आणि नुकसानभरपाई द्यावी असे तिवसाघाट येथील नर्सरीधारक उद्धव फुटाणे यांनी सांगितले .

Web Title: Prices of oranges have also gone up but there is no demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.