अल्पवयीन मातेचा अघोरी गर्भपात; मृत अर्भकाला पिशवीत भरुन ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 12:11 IST2021-08-11T12:10:11+5:302021-08-11T12:11:52+5:30

Amravati News मध्य प्रदेशातील रहिवासी अल्पवयीन मातेला अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाल्यानंतर शेतातील झोपडीत अघोरी उपचाराने गर्भपात करण्यात आला. मृत नवजाताला पिशवीत भरुन ठेवले.

Premature abortion of a minor mother; The dead baby was put in a bag | अल्पवयीन मातेचा अघोरी गर्भपात; मृत अर्भकाला पिशवीत भरुन ठेवले

अल्पवयीन मातेचा अघोरी गर्भपात; मृत अर्भकाला पिशवीत भरुन ठेवले

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मातेला अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाल्यानंतर शेतातील झोपडीत अघोरी उपचाराने गर्भपात करण्यात आल्याची घटना घडली. यावेळी मृत नवजाताला पिशवीत भरुन ठेवण्यात आले होते.

अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारार्थ अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे गर्भपातासह नवजात अर्भकाच्या मृत्यूचे बिंग फुटले. मृत अर्भक पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता अमरावती येथे पाठविले. अल्पवयीन माता सध्या जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार घेत आहे.

 

Web Title: Premature abortion of a minor mother; The dead baby was put in a bag