प्रशांत देशपांडे सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष
By Admin | Updated: April 2, 2017 00:07 IST2017-04-02T00:07:58+5:302017-04-02T00:07:58+5:30
जिल्हा वकील संघाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. त्यामध्ये प्रशांत देशपांडे हे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विजयी झालेत.

प्रशांत देशपांडे सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष
जिल्हा वकील संघ निवडणूक : चंदन शर्मा उपाध्यक्ष, आनंद पुरोहित सचिव
अमरावती : जिल्हा वकील संघाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. त्यामध्ये प्रशांत देशपांडे हे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विजयी झालेत. त्यांना ४७३ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी महेंद्र तायडे यांना ३४६ मते मिळाली.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. यात प्रशांत देशपांडे यांना सर्वाधिक मते मिळाली. या पदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते. तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार विवेक बारलिंगे यांना ८६ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी चंदन शर्मा विजयी झालेत. त्यांना ४७४ मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर गजानन आकोलकर यांना ३८५ मते मिळाली. सचिवपदासाठी प्रतीक पाटील विजयी झालेत. त्यांना ५३२ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी अतुल भेरडे यांना २८२ मते मिळाली. दिनेश शर्मा यांना ८६ मते मिळाली. ग्रंथालय सचिवपदासाठी आनंद पुरोहित यांना ४१२ मते मिळाल्याने ते विजयी ठरले. सुरेंद्र गावंडे यांना २७४ व भारती येवले यांना १९८ मते मिळाली. तर सदस्यांमध्ये अभिषेक निस्ताने-६३१, मोहन मोरे- ६०६, तृप्ती रावत- ६०३, सोनाली फुसे ५९०, धीरज रानोटकर- ५८९, रमेश माळी- ५५९, प्रशांत कडूकर- ५४२ यांना सर्वाधिक मते मिळाल्याने ते विजयी झालेत. तालीब खान यांना ४७४, अमर नंदेश्वर यांना ३८० व शोभा मिश्रा यांना ३३३ मते मिळाली असून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. (प्रतिनिधी)