शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांच्या कलाकृतीची पालकमंत्र्यांकडून स्तुती

By admin | Updated: September 5, 2016 00:18 IST

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी येथील मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने स्थानिक नेहरू मैदानावर विविध साहित्य, वस्तू विक्रीचे स्टॉल लावले आहे.

स्टॉलला भेट : ईको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी साहित्य विक्रीअमरावती : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी येथील मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने स्थानिक नेहरू मैदानावर विविध साहित्य, वस्तू विक्रीचे स्टॉल लावले आहे. रविवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या स्टॉलला भेट देऊन कैद्यांनी साकारलेल्या कलाकृतीची स्तुती केली. यावेळी ना.पोटे यांचे कैदी बांधवांनी पुष्पगुच्छांनी स्वागत केले.गणेशोत्सवासाठी लागणारे लाकडी पाट, दिवे, पूजेचे साहित्य आदी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नेहरु मैदानावर लागलेल्या स्टॉलला रविवारी पालकमंत्री पोटे यांनी भेट देऊन कैद्यांनी साकारलेल्या वस्तुंची पाहणी केली. ज्या हाताला गुहेगारीचा कलंक लागला आहे ते हात आता कलाकुसर साकारूलागल्याने त्यांची कलाकृती बघून पालकमंत्री अवाक् झालेत. पाषाण भिंतीच्या आत शिक्षा भोगत असताना कैदी सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत सुंदर आणि सुरेख कलाकुसर साकारू शकतात, हे स्पष्ट झाले. यावेळी कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी ना. पोटे यांना कारागृहातील कामकाजाची माहिती दिली. कारागृहातील कैद्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी ना. पोटे यांच्या पुढ्यात ठेवण्यात आली. दरम्यान कारखाना व्यवस्थापक तुरुंगाधिकारी माया धतुरे, हवालदार गजानन क्षीरसागर, सुभेदार विक्रम तिवस्कर, धर्मपाल शेंद्रे, संग्राम नेवसे आदींनी पालकमंत्र्यांना कारागृहातील कारखान्यात होणाऱ्या कामकाजांची माहिती दिली.पालकमंत्र्यांनी खरेदी केली आरामखुर्ची, टी ट्रेकैद्यांनी साकारलेल्या वस्तू, साहित्य बघून पालकमंत्र्यांनादेखील साहित्य खरेदी करण्याचा मोह आवरला नाही. नेहरू मैदानात स्टॉलवर विक्रीसाठी असलेल्या साहित्यापैकी पालकमंत्र्यांनी सागवान लाकूडनिर्मित आरामखुर्ची व टी ट्रे खरेदी खरेदी करून कैद्यांना प्रोत्साहित केले, हे विशेष.