अमरावती शहरात पुढील सहा दिवस राहणार वीजपुरवठा राहणार बंद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:54 IST2025-05-29T12:52:49+5:302025-05-29T12:54:29+5:30

Nagpur : वादळामुळे प्रभावित; वीज यंत्रणा दुरुस्तीला झाली आजपासून सुरुवात

Power supply will remain cut off in Amravati city for the next six days | अमरावती शहरात पुढील सहा दिवस राहणार वीजपुरवठा राहणार बंद !

Power supply will remain cut off in Amravati city for the next six days

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
वादळामुळे प्रभावित झालेली वीज यंत्रणा तसेच पावसाळा लक्षात घेता देखभाल, दुरुस्तीच्या कामे २९ मे ते ३ जूनपर्यंत केली जाणार आहेत. फीडर निहाय ती कामे करण्यात येणार असल्याने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यत संबधित भागातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय सराटे यांनी केले आहे.


गुरुवारी ११ केव्ही श्रीकृष्णपेठ फिडरवरील देखभाल दुरुस्ती करण्यात येणार असल्याने या फीडरवरून वीजपुरवठा होणाऱ्या श्रीकृष्णपेठ, इर्विन चौक येथील काही भाग, शिवाजी सायन्स कॉलेज, तहसील, देवराव गॅरेज या भागाचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. ३० मे रोजी ११ केव्ही चौधरी चौक फीडरवरील वॉलकट कंपाऊंड, कॉटन मार्केट रोड, एपीएमसी, बच्छराज प्लॉट, चौधरी चौक, सिंधी चौक, राम-लक्ष्मण संकुल या भागाची दुरुस्ती होणार आहे. ३१ मे रोजी ११ केव्ही एच.टी. फीडरवरील डफरीन, सुपर स्पेशालिटी, शासकीय तंत्रनिकेतन, जिल्हा क्रीडालय, सांस्कृतिक भवन परिसरात वीज बंद राहिल. १ जून रोजी ११ केव्ही रेल्वे स्टेशन फीडरवरील कामे करण्यात येणार असल्याने जिल्हा रुग्णालय, खापर्डे बगीचा, समाधाननगर, होली क्रॉस, रेल्वे स्टेशन रोड, बसस्थानक, काझी कंपाऊंड, बसस्टँड रोड या भागाचा वीजपुरवठा बंद राहील. २ जूनला ११ केव्ही एल.आय.सी. फीडर दुरुस्तीमुळे अशोकनगर, एलआयसी ऑफिस, गौतमनगर, रामपुरी कॅम्प, भीमनगर, सिद्धार्थनगर, सिव्हिल लाइन या भागाचा, वीजपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती महावितरणने दिली. 

Web Title: Power supply will remain cut off in Amravati city for the next six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.