तालुक्यात पावसाची हजेरी होताच वीज पुरवठा होतो खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:21+5:302021-07-21T04:11:21+5:30
तर दुसरीकडे पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होतो आणि ही परिस्थिती जवळपास 90 टक्के पर्यंत खरी ठरत आहे ...

तालुक्यात पावसाची हजेरी होताच वीज पुरवठा होतो खंडित
तर दुसरीकडे पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होतो आणि ही परिस्थिती जवळपास 90 टक्के पर्यंत खरी ठरत आहे . त्यामुळे पावसाचे येणे आणि विजेचे जाणे याबाबत ये रिश्ता क्या कहलाता है अशी आता जनता विचारणा करू लागले आहे . धारणी तालुक्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे अनेकांनी उशिरा पेरणी केली असून काही प्रमाणात सध्या नापीक असलेले क्षेत्र सुद्धा पेरणीच्या प्रतीक्षेत आहे . परंतु वारंवार मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात होईल असे दिसत असताना मात्र अवघ्या काही मिनिटात पाऊस बेपत्ता होतो . तसेच पावसाची सर्वत्र एकाच वेळी पडण्याची परंपरा यंदा खंडित झाली असून काही भागात पाऊस तर काही भागात ऊन अशी परिस्थिती सध्या मेळघाटात बघावयास मिळत आहे . त्यामुळे यंदा खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिके हातात येणार की जाणार याचा अंदाज भले भले करू लागले आहेत .