शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

जूनच्या पहिल्या आठवड्यात निकालाची शक्यता

By admin | Updated: May 29, 2014 01:38 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ढाकणा परिक्षेत्रातील वाघ शिकार प्रकरणाच्या पहिल्या तक्रारीची सुनावणी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पूर्ण झाली

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ढाकणा परिक्षेत्रातील वाघ शिकार प्रकरणाच्या पहिल्या तक्रारीची सुनावणी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पूर्ण झाली असून मेळघाट टायगर क्राईम सायबर सेलने दाखल केलेल्या पहिल्या तक्रारीवरील निकालाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता न्यायालयीन सुत्राने वर्तविली.

विदर्भातील वाघ शिकार प्रकरणाचे अमरावती, नागपूर, दिल्ली आदी ठिकाणच्या न्यायालयात खटले सुरु आहेत. मेळघाट वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा स्थापना झाल्यावर जवळपास ४0 पेक्षा अधिक तस्करांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. पुणे, दिल्ली, आंध्रप्रदेश ओरिसा, उत्तराचल, मध्यप्रदेश व मेळघाटच्या सिनबंस, मोथाखेडा आदी ठिकाणी स्थानिक रहिवाश्यांच्या मदतीने वाघाची शिकार करुन अवयवयाची तस्करी करण्यासारखे गंभीर आरोप ठेवून अटक करण्यात आली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येणार्‍या ढाकणा वनपरिक्षेत्रात डिसेंबर २0१२ मध्ये वाघाची हत्या करण्यात आली होती. तर ४ मार्च २0१३ मध्ये प्रकरण उघडकीस आले होते. सदर प्रकरणात मेळघाटच्या सिनबन व मोथाखेडा या गावातून मधुसिंग, विनोद पवार, चिंताराम अनेंश राठोड, नरविलाल, सागरलाल, मिश्रीलाल या सहा तस्करांना पहिल्या तक्रारीवर अटक करण्यात आली होती. वाघाची नियोजनबद्ध शिकार करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अचलपूर जिल्हासत्र न्यायालयातून हे प्रकरण ३0 मे २0१३ रोजी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जयंत राजे यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले. त्यावर पुरावे, साक्षीदार, उलट तपाणी आदी प्रक्रिया १६ फेब्रुवारी पर्यंत पुर्ण करण्यात आली आहे. तर बुधवारी (२८मे) निकाल येण्याची अपेक्षा होती. न्यायालयाने त्यावर पुढील ६ जून ही तारीख दिली आहे. ( प्रतिनिधी)