पोलीसदादाची माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T06:00:53+5:30
‘सोशल मीडिया’वर यासंदर्भाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मदत करणाऱ्या त्या पोलीसदादांचे नाव नीलेश्वर भिसे आहे, तर सदर युवक हा आसेगाव पूर्णा येथील असल्याची माहिती पुढे आली. संचारबंदीत फिरणाºया युवकांना एकीकडे पोलीस दंडुक्याचा प्रसाद देत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. यादरम्यान पोलीस सामाजिक बांधीलकी जपत असल्याची काही उदाहरणे पुढे आली आहेत.

पोलीसदादाची माणुसकी
अमरावती : मध्य प्रदेशातील बिलासपूर येथून तीन दिवसांपूर्वी पायी निघालेल्या युवकाला वाटेतच एक पोलीसदादा भेटले. त्यांनी युवकाला दुचाकीवर बसवून लिफ्ट देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. ही बाब शहरातील वेलकम पॉइंटजवळ गुरु वारी रात्री ८ वाजता निदर्शनास आली.
‘सोशल मीडिया’वर यासंदर्भाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मदत करणाऱ्या त्या पोलीसदादांचे नाव नीलेश्वर भिसे आहे, तर सदर युवक हा आसेगाव पूर्णा येथील असल्याची माहिती पुढे आली. संचारबंदीत फिरणाऱ्या युवकांना एकीकडे पोलीस दंडुक्याचा प्रसाद देत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. यादरम्यान पोलीस सामाजिक बांधीलकी जपत असल्याची काही उदाहरणे पुढे आली आहेत.
शिक्षणतज्ज्ञ अतुल गायगोले यांना ही बाब निदर्शनास येताच त्यांनी थेट त्या पोलिसाला विचारले. तेव्हा ही हकीकत पुढे आली. आसेगाव पूर्णाचा युवक तीन दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील बिलासपूर येथून पायी निघाला होता. मी जेथपर्यंत जात आहे, तेथपर्यंत त्याला लिफ्ट देणार असल्याचे नीलेश्वर भिसे यांनी सांगितले. गायगोले यांनी त्यांच्या सामाजिक जाणिवेला सलाम केला.
पोलीसदादा युवकाला घेवून पुढच्या वाटेवर निघाले. मात्र, या घटनेमुळे पोलिसांचे माणुसकी जपणारे दुसरेही रुप समाजापुढे आले. ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.