शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील पोलीस पथक 'विड्रॉल'

By admin | Updated: March 12, 2016 00:06 IST

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला सुरक्षा प्रदान करणारे शहर पोलीस आयुक्तालयातील पथक 'विड्रॉल' करण्यात आले.

एक कोटीचे वेतन थकीत : पोलीस विभागाकडून पत्रअमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला सुरक्षा प्रदान करणारे शहर पोलीस आयुक्तालयातील पथक 'विड्रॉल' करण्यात आले. सुरक्षा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे एक कोटीचे वेतन थकीत असल्यामुळे हा निर्णय पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी घेतला. यासंदर्भात पोलीस विभागाकडून महापालिका प्रशासनाला पत्र पाठविण्यात आले . शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना महापालिका कर्मचाऱ्यांशी अतिक्रमित हुज्जत घालतात. त्यामुळे अतिक्रमण काढताना पोलीस संरक्षण हवे अशी, मागणी महापालिका वारंवार होत असते. महापालिकेच्या मागणीनुसार पोलीस कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पाठविण्यात येते. याकरिता पोलिसांना महापालिकेकडून वेतन देण्यात येते. मागील काही वर्षांत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. मात्र, या पोलिसांचे ८० लाखांचे वेतन थकीत होते. त्यातच जानेवारी २०१५ पासून महापालिकेला एक स्वतंत्र पोलीस पथक देण्यात आले. त्यांचेही ४० लाखांचे वेतन महापालिकेने दिले नव्हते. या स्वतंत्र पथकात एपीआय खराटे यांच्यासह १२ पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या थकबाकीपैकी महापालिकेने पोलीस विभागाला २० लाखांची रक्कम दिली आहे. मात्र, तरीसुध्दा एक कोटींच्या जवळपास वेतन थकीत असल्याचे पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी महापालिकेला पत्र पाठविले असून सद्यस्थितीत महापालिकेतील पोलीस पथक विड्रॉल केले आहे. मात्र, महापालिकेच्या मागणीनुसार वेळोवेळी पोलीस सरंक्षण दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)