पोलिसांची नाकाबंदीही कुचकामी

By Admin | Updated: May 5, 2014 00:19 IST2014-05-05T00:19:10+5:302014-05-05T00:19:10+5:30

चेन स्नॅचिंग, घरफोडी, दरोड्यासारख्या घटनांमधील आरोपींना पकडण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली.

Police blockade ineffective | पोलिसांची नाकाबंदीही कुचकामी

पोलिसांची नाकाबंदीही कुचकामी

अमरावती : चेन स्नॅचिंग, घरफोडी, दरोड्यासारख्या घटनांमधील आरोपींना पकडण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली. हे दरोडेखोर हे गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजानननगरात नागरिकांना गवसले. याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परंतु पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात ते यशस्वी ठरले. चोरट्यांनी शहरातील गाडगेनगर, वलगाव व राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकाच रात्री ९ घरफोड्या करुन ऐवज चोरून नेला. या घटनांची शाई वाळत नाही तोच शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चंदननगरातील रामचंद्र भालेराव यांच्या निवासस्थानी दरोडा घातला. कुटुंबातील सदस्यांना मारहाण करुन त्यांनी ऐवज चोरुन नेला. अलीकडे शहरात दररोज चोरी, घरफोडीच्या घटना घडत आहेत. परंतु आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी रात्रभर नाकाबंदी केली. यावेळी शहरात गुन्हे अन्वेषण शाखेची गस्त सुरु होती. दरम्यान गजानननगर परिसरात मध्यरात्री सहा जण तोंडाला रुमाल बांधून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस ताफा गजानननगरात धडकला. परंतु पोलिसांची चाहूल लागताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. दिवसेंदिवस शहरात घडत असलेल्या चोरी व लुटमारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशात पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश येत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police blockade ineffective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.