शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ‘पीएम मित्रा’ मेगा टेक्सटाइल पार्क, विदर्भाच्या विकासाला मिळणार 'बूस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 10:40 IST

पंतप्रधान मोदींची घोषणा : मेगा टेक्सटाईल पार्कसाठी नांदगाव पेठच्या औद्याेगिक वसाहतीत जमिनीचे आरक्षण

अमरावती : महाराष्ट्रातील अमरावतीसह देशात सात ठिकाणी 'पीएम मित्रा' अंतर्गत (मेगो इंटिग्रेटेड टेक्सटाइल रिजन अॅण्ड अॅपेरल) मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाइल पार्क स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. अमरावतीजवळ नांदगाव पेठ येथे हा पार्क उभारला जाणार असून त्यामुळे पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

एक हजार एकरावर होणाऱ्या या टेक्सटाइल पार्कमुळे १० हजार कोटींची गुंतवणूक शक्य असून, जवळपास एक लाख रोजगार निर्माण होतील. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आणि उत्तर प्रदेशमध्ये 'पीएम मित्रा'अंतर्गत हे पार्क उभारण्यात येणार आहेत. पाच 'एफ'च्या (फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन) व्हिजननुसार या पार्कमुळे देशातील वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना मिळेल.

अमरावती नजीकच्या नांदगाव पेठ येथे पंचतारांकित एमआयडीसीचा परिसर २८०९.७८ हेक्टर एवढा परिसर आहे. उद्योगासाठी एकूण १०७ भूखंड आरक्षित ठेवण्यात आले आहे. रेमण्ड, व्हीएचबी हे महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. तर रतन इंडिया औष्णिक वीज प्रकल्प कार्यान्वित आहे. 

काय असेल या पार्कमध्ये

  • जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा
  • कापड उद्योगासाठी एकात्मिक प्रक्रिया
  • आधुनिक औद्योगिक पायाभूत सुविधा
  • कमीत कमी एक हजार एकर जमिनीवर पार्कची स्थापना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावतीत मेगा टेक्स्टाईल पार्क मंजूर केला. या माध्यमातून एक लाख लोकांना थेट रोजगार, दोन लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. पंतप्रधानांचे ‘फायबर टू कॉटन’ हे स्वप्न पूर्णत्वास जाणार आहे.

- डॉ. अनिल बोंडे, खासदार

अमरावती येथे टेक्स्टाईल पार्क निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गाेयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार केला होता. मेगा टेक्स्टाईल पार्क मंजुरीमुळे एक लाख लोकांना रोजगाराची संधी मिळेल.

- नवनीत राणा, खासदार, अमरावती

टॅग्स :Textile Industryवस्त्रोद्योगbusinessव्यवसायNarendra Modiनरेंद्र मोदीAmravatiअमरावतीVidarbhaविदर्भ