पीएम किसान सन्मान योजना : अमरावतीतील तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज दोन हजाराची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 18:27 IST2025-08-02T18:27:27+5:302025-08-02T18:27:52+5:30

Amravati : पीएम किसान सन्मान योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्टला होणार जमा

PM Kisan Samman Yojana: Rs 2,000 entered into the accounts of three lakh farmers in Amravati today | पीएम किसान सन्मान योजना : अमरावतीतील तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज दोन हजाराची एन्ट्री

PM Kisan Samman Yojana: Rs 2,000 entered into the accounts of three lakh farmers in Amravati today

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
पीएम किसान सन्मान योजनेचा २० वा हप्ता मंगळवारी जिल्ह्यातील २.८५ लाख खात्यात जमा होत आहे. 'फार्मर आयडी' नसलेल्या खात्यात प्रत्येकी दोन हजार जमा होतात काय, की त्यांना वगळले जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


यापूर्वी १८ जुलै रोजी हा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र शासनाद्वारे करण्यात आली होती. मात्र त्यादिवशी लाभ बँक खात्यात जमा न झाल्याने शेतकरी प्रतीक्षेत होते. त्यानंतर या योजनेचा २० हप्ता २ ऑगस्टला जमा करण्यात येणार असल्याचे केंद्र शासनाद्वारे स्पष्ट करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ डिसेंबर २०२९ पासून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दर चार महिन्यात प्रत्येकी दोन हजाराचा म्हणजेच वर्षाला प्रत्येकी सहा हजारांचा लाभ ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. 


फार्मर आयडी असल्यासच लाभ?
पीएम किसानमध्ये केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक योजनेचा फार्मर आयडी नोंद असल्यासच लाभ मिळणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. जिल्ह्यात या योजनेच्या ९५ टक्क्यांवर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंद केला आहे. त्यामुळे फार्मर आयडी नसल्यास लाभमिळेल काय? याची माहिती स्पष्टता २ ऑगस्टला होणार आहे.


तालुकानिहाय लाभार्थी
ई-केवायसी केलेले अचलपूर तालुक्यात २३,५१४, अमरावती १६,७६३, अंजनगाव सुर्जी २०,०४२, भातकुली १६,७४४, चांदूर रेल्वे १४,२६४, चांदूर बाजार २७,४४३, चिखलदरा ११,४९२, दर्यापूर २५,२४३, धामणगाव १८,७४९, धारणी १८,२४५, मोर्शी २५,८३२, नांदगाव २३,४६४, तिवसा १५,७२४ व वरुड तालुक्यात २७,४६५ शेतकरी लाभार्थी आहेत.


 

Web Title: PM Kisan Samman Yojana: Rs 2,000 entered into the accounts of three lakh farmers in Amravati today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.