बायोमेट्रिकचे अर्ज परत करा
By Admin | Updated: April 26, 2015 23:53 IST2015-04-26T23:53:23+5:302015-04-26T23:53:23+5:30
सध्या रेशन दुकानदारांकडून बायोमेट्रिक पध्दतीकरिता शिधाधारकांचे अर्ज भरुन घेतले जात आहे. यासाठी त्यांना ५ रुपये देण्यात येते.

बायोमेट्रिकचे अर्ज परत करा
प्रल्हाद मोंदीचे आवाहन : रेशन दुकानदार, केरोसीन परवानाधारकांचा मेळावा
अमरावती : सध्या रेशन दुकानदारांकडून बायोमेट्रिक पध्दतीकरिता शिधाधारकांचे अर्ज भरुन घेतले जात आहे. यासाठी त्यांना ५ रुपये देण्यात येते. या पाच रुपयांना किती किंमत आहे? परवान्यात रेशन दुकानदारांनी फार्म भरावे, असे कुठे लिहिले आहे? ही जबाबदारी प्रशासनाची असून त्यासाठी ते पगार घेतात. त्यामुळे या कोऱ्या अर्जाचे गठ्ठे परत करा, मुख्यमंत्री फडणवीसांना पाहून घेऊ, सरकार तालावर येईल, असे आवाहन नरेंद्र मोदी यांचे बंधू व आॅल इंडिया फेअर प्राईज डिलर असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी येथे केले.
अमरावती विभागातील रेशनदुकानदार व केरोसीन परवानाधारकांचा मेळावा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात रविवारी आयोजित होता. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य संघटनेचे अध्यक्ष डी.एन. पाटील होते. यावेळी मंचावर सरचिटणीस कॉम्रेड चंद्रकांत यादव, ज्येष्ठ उपाध्यक्ष राजेश अंबुसकर, मुख्य मार्गदर्शन आर.एस. अंबुलकर यासह सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, गुजरातमध्ये विविध कारणांनी बायोमॅट्रीक योजना नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना पुढे ढकलावी लागली. गुजरात सरकारच्या विरोधात ७ वेळा उच्च न्यायालयात दाद मागितली. सर्व वेळा जिंकलो आहो. बायोमॅट्रीक यंत्रणा लागत आहे. घाबरु नका. यामध्ये पळवाटा अधिकारीच शोधून देतात. त्यांनाच गरज आहे, खऱ्या अर्थान या सरकारी यंत्रनेमुळेच रेशन दुकानात जात काळाबाजार होतो, असा आरोपी मोदी यांनी केला.
मेळाव्याच्या सुरुवातीला भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश उल्हे, संचालन व आभार प्रदर्शन राज्य उपाध्यक्ष राजेश अंबुसकर यांनी केले. मेळाव्याला विभागातील रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.